संदीप मारवा यांना दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.


प्रख्यात चित्रपट व टेलीविजन व्यक्तिमत्व संदीप मारवा यांना पाच विश्व विक्रमासह, चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल मुंबईतील चित्रकूट मैदानावर प्रतिष्ठित दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जगात सर्वात वेगाने वाढणारी नोएडा फिल्मसिटी चे संदीप मारवा संस्थापक आहे. हा एकूण परिसर १०० एकरचा आहे, त्यात ७५ एकरचा आउटडोर तर २५ एकरचा इनडोर, १६ स्टुडिओ, ३५० चैनल्स १६२ देशांतून २४ × प्रसारित केले जात आहेत, १७ हजार मीडिया कर्मचारी फिल्मसिटी मध्ये काम करत आहे आणि त्याचा प्रभाव हा आहे कि फिल्मसिटी मध्ये दिड लाख लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत.

उत्तर भारत चे संदीप मारवा हे पहिले प्रोफेशनली मारवा स्टुडिओचे संस्थापक आहेत आणि ५० हून अधिक चैनल्स साठी ४५०० हून जास्त टेलीविजन प्रोगाम, १५० फिचर फिल्म्स, ५००० ट्रेनिंग फिल्म्स आणि १९९१ पासून भारतात अधिकांश चैनल्स साठी कार्यक्रम बनविले आहे.

एशियन एकेडमी ऑफ फिल्म एंड टेलीविज़न चे संदीप मारवा संस्थापक डायरेक्टर आहेत आणि ही देशातील पहिली प्राइवेट फिल्म स्कूल आहे आणि १९९३ पासून १२० देशा मधील १२००० मिडियांच्या लोकांना प्रशिक्षित केले आहे. आता एएएफटी ही जगातील पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट फिल्म स्कूल मधील एक आहे.

जगातील सर्वात जास्त शॉर्ट फिल्म्स चे निर्माता संदीप मारवा आहेत. त्यांना दहा हजाराहूंन अधिक फिल्म्स मधून १०० देशातून २३०० शॉर्ट फिल्म्स शूट करण्याची संधी मिळाली. बहुतेक सिनेमे सामाजिक मुद्दे, डाक्यूमेंट्ररीज वर थीम-बेस फिक्शन वर आधारित होती.

संदीप मारवा यांनी एंटरटेन्टमेंट इंडस्ट्री मधील १० सर्वश्रेष्ठ फेस्टिवल डिजाइन केले आहेत, जसे ग्लोबल फिल्म फेस्टिवल, ग्लोबल फेस्टिवल ऑफ जर्नलिज्म, ग्लोबल लिटरेरी फेस्टिवल, ग्लोबल फैशन वीक, एएएफटी फेस्टिवल ऑफ शॉर्ट डिजिटल फिल्म्स. त्यांनी फिल्म टूरिज्मला शब्दकोषात स्थान दिलेआहे आणि आता नोएडा फिल्मसिटी कडे मिलियन लोकांना आकर्षित केले आहे.

मारवा स्टूडियो चे अध्यक्ष संदीप मारवा यांनी सांगितले कि हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्यात नव चैतन्य जागृत झाले आहे आणि भारतीय सिनेमाचा जनकाचा पुरस्कार माझ्यासाठी फारच मोलाचा आहे.

अंतर्राष्ट्रीय चैंबर ऑफ मीडिया एंड एंटरटेनमेंट इंडस्ट्री चे अध्यक्ष संदीप मारवा यांना जास्तीत जास्त फिल्ममेकर्स, टेलीविजन व मीडिया मधील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर