Posts

Showing posts with the label #corona #virus #johny lever #rishi kapoor #irrfan khan #amitabh bachchan #pm #narendra modi #udhav thakery #ramayan #serial #world record #tata trust #film industry #bollywood

Bollywood Market – Issue 2nd May 2020 – Page 1

Image

Bollywood Market – Issue 2nd May 2020 – Page 2

Image

Bollywood Market – Issue 2nd May 2020 – Page 3

Image

Bollywood Market – Issue 2nd May 2020 – Page 4

Image

जॉनी लीवर म्हणतो फिल्म इंडस्ट्रीत कोणीही कोणाचा मित्र नसतो

Image
मिमिक्री आर्टिस्ट म्हणून जॉनी लीवर ने आतापर्यत अनेक स्टेज शोज केले व त्याचबरोबर आपल्या कॉमेडीचा जलवा सिनेमातून देखील दाखवुन दिला आहे. तसा पाहिला तर जॉनी लीवरचा कॉमेडी प्रवास फारच खडतर राहिला आहे. शालेय शिक्षण कसे-बसे सातवीपर्यंत केल्यानंतर अनेक प्रकारची छोटी-मोटी कामे केली. एवढंच काय तर रस्त्यावर बसुन अनेक कलाकारांचे आवाज काढून पेन देखील विकले. असाच एक दिवस पेन विकत असताना जॉनी कॉमेडी अंदाजात ले लो भाई पेन ले लो... म्हणत होता व म्युनिपालिटीची गाडी येते व जॉनीने पेनचे मांडलेले दुकान घेऊन जाते व जॉनी कॉमेडी करत बघत राहतो. हिंदुस्तान लीवर कंपनीत काम करत होता म्हणूनच जॉनीचे जॉनी लीवर हे नाव पडले. त्या कंपनी अनेक प्रकारच्या नकला करीत असे व सणा-सुदीत असलेल्या कार्यक्रमांतुन कामगार लोकांचे मनोरंजन करीत असे. जॉनी लीवरने जवळ-जवळ ७-८ वर्षे हिंदुस्तान लीवर मध्ये काम केल्यानंतर स्टेज आर्टिस्ट म्हणून शोज मध्ये काम करु लागला व त्यानंतर हळू-हळू सिनेमांत देखील कामे करु लागला. इतक्या वर्षे सिनेमांत काम केल्यानंतर देखील जॉनी अजून देखील शोज करत आहे. सिनेमांत कोणी जवळचा मित्र आहे का? ह्यावर जॉनी म्हणत...

फिल्म इंडस्ट्रीतील ‘ऋषी युग’ संपले

Image
इरफान खान यांच्या दु:खद बातमीतुन कुणी सावरत नाही तोच ऋषी कपुर गेल्याची बातमी दुस-या दिवशी येऊन थडकली. कपुर खानदानातला उत्तम अभिनेत्यांच्या साखळीतला एक हिरा निखळला. चित्रपट ‘श्री ४२०’ मधील पावसातातून छत्री घेऊन जाणारा छोटासा चिंटू म्हणजेच ऋषि कपूर पहावयास मिळाला होता व त्यानंतर "मेरा नाम जोकर" पासुन पडद्यावर दिसायला सुरूवात करणा-या हया टिन-एजरने तारुण्यात प्रवेश करताच "बॉबी" मधून त्याने आपण लंबीरेसचा घोडा आहोत हे दाखवुन दिले होते. अभिनयावर तर त्याच प्रभुत्व होतच, पण डांसमधील त्याची सहजताही मन आकर्षुन घ्यायची. आपली हिरो पासुन सुरु झालेली इनींग तितक्याच ताकदीने त्याने व्हिलन म्हणुनही तितकीच आश्वासक गाजवली. जे मनात आहे ते बेबाक बोलुन टाकणारा, परिणामांची पर्वा न करणारा हा अभिनेता होता. ह्या जगाला अलविदा करताना ऋषी कपुर ने हसत-हसत निरोप घेतला व फिल्म इंडस्ट्रीतील ‘ऋषी युग’ संपले असे हसत मुखाने जाहिर केले. कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना ऋषि कपूरचा चाहतावर्ग कोणीही त्यांच्या अंतदर्शनास पोहचु शकत नव्हता, त्यावेळी सिनेमा ‘बॉबी’ मधील सुपरहिट गाणं आठवले -- अंद...

इरफान खान यांच्या निधनाने बॉलिवुडसह राजकीय क्षेत्रातदेखील शोककळा पसरली

Image
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील त्यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन इरफानला श्रद्धांजली अर्पण केली -- 'इरफान खानच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात - इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांब...

सुपरहिट मालिका ‘रामायण’ ने बनविला वर्ल्ड रिकॉर्ड

Image
कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना सरकार ने रामानंद सागर यांची सुपरहिट सीरियल ‘रामायण’ चे दूरदर्शन पर पुन्हा एक वेळ प्रक्षेपण सुरु केले व ह्या शो ने विश्व रिकॉर्ड स्थापित केले आहे. ही मालिका ७.७ कोटी पेक्षा जास्त दर्शकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर उत्तर रामायणात लव व कुश ने रामकथा ऐकली तेव्हा तर दर्शकवर्ग एकदम भावुक झाला होता व आजच्या मॉडर्न युगातील तरून पिढिला देखील रामकथा ऐकण्याची संधी मिळाली. जयश्रीराम

'पांच कदम, करोना मुक्त जीवन' टाटा ट्रस्टचे महाराष्ट्रात आरोग्य अभियानात कलाकारांनी साथ दिली

टाटा ट्रस्ट्सने संपूर्ण राज्यभरात एक आरोग्य अभियान सुरु केले आहे.  कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य उपाययोजनांची अंमलबजावणी केली जावी यासाठी संपूर्ण समाजाला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.  ३१ मार्चपासून सुरु झालेले हे अभियान राज्यभरातील २१ लाख लोकांपर्यंत पोहोचले असण्याची अपेक्षा आहे. 'पांच कदम, करोना मुक्त जीवन' हे या अभियानाचे नाव असून यामध्ये व्हिडिओ संदेश, छोटे ऍनिमेशन व्हिडिओज् आणि इन्फोग्राफिक्सपासून ऑडिओ संदेश आणि एसएमएसवर आधारित संदेश यांचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही संघटनेला इच्छा असल्यास या अभियानाचा वापर करता यावा यासाठी टाटा ट्रस्टने सोशल मीडियामार्फत जवळपास ३०० व्हिडिओज् आणि ऑडिओ संदेश सार्वजनिकरित्या उपलब्ध करवून दिले आहेत. हे संदेश मराठीसह अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार करण्यात आले आहेत. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, भारत गणेशपुरे, सोनाली कुलकर्णी, डॉ. अमोल कोल्हे, गायत्री दातार, अंकुर वाढावे, शशांक उदापूरकर, देवाजी टोफू, शिव ठाकरे, अतुल कुलकर्णी यासारख्या ...

Rishi Kapoor no more

Image
कालच्या इरफान खान यांच्या दु:खद बातमीतुन अजुन कुणी सावरल नाही तोच ऋषी कपुर गेल्याची बातमी येऊन थडकली. कपुर खानदानातला उत्तम अभिनेत्यांच्या साखळीतला एक हिरा आज नीखळला.." मेरा नाम जोकर " पासुन पडद्यावर दिसायला सुरवात करणार्या या टिन एजरने तारुण्यात प्रवेश करताच " बॉबी " मधून त्याने आपण लंबीरेसचा घोडा आहोत हे दाखवुन दिल होत. अभिनयावर तर त्याच प्रभुत्व होतच पण न्रुत्यातली त्याची सहजताही मन आकर्षुन घ्यायची. आपली हिरो पासुन सुरु झालेली इनींग तीतक्याच ताकदीने त्याने व्हिलन म्हणुनही तीतकीच आश्वासक गाजवली. जे मनात आहे ते बेबाक बोलुन टाकणारा,परिणामांची पर्वा न करणारा हा अभिनेता होता.