Posts

Showing posts with the label Remo D'souza

कल्याणमध्ये रेमो डिसुजाच्या नव्या सिनेमाचे शूटिंग

Image
कल्याण - कल्याण हे ऐतिहासिक तर डोंबिवली सांस्कृतिक शहर म्हणून ओळख जाते. या पार्श्वभूमीवर ‘फालतू’ आणि ‘एबीसीडी’ या दोन चित्रपटांचा दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुजा आपल्या पुढील चित्रपटाचे चित्रीकरण कल्याणात करणार आहे. त्यासाठी डिसुजा यांनी पालिकेकडून १२ दिवसांची परवानगी घेतली आहे. या चित्रीकरणासाठी रेमो डिसुजा महापालिकेला दिवसाला २५ हजार रुपए मोजणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत 3 लाख रुपए जमा होणार आहेत. कल्याण- डोंबिवली आता हिंदी चित्रपट निर्मात्यांना खुणावत असून चित्रीकरणाच्या माध्यमातून पालिकेला उत्पन्नाचा नवा मार्ग मिळाला आहे. शहरात अनेकदा हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र चित्रीकरणासाठी यापूर्वी पालिकेची कधीही परवानगी घेण्यात आली नव्हती. अनेकदा चित्रीकरण होऊनही पालिकेने रॉयल्टी मिळावी यासाठी दावा केला नव्हता. पीयुष डान्स अ‍ॅकॅडमी ने मे महिन्याच्या अखेरीस पालिका क्षेत्रात चित्रीकरण करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी मिळण्यापूर्वीच त्यांनी चित्रीकरणाचे काम सुरू केले होते. महापालिकेचे उपकरनिर्धारक संकलक संजय शिंदे यांनी या चित्रपटा...