कल्याणमध्ये रेमो डिसुजाच्या नव्या सिनेमाचे शूटिंग


कल्याण - कल्याण हे ऐतिहासिक तर डोंबिवली सांस्कृतिक शहर म्हणून ओळख जाते. या पार्श्वभूमीवर ‘फालतू’ आणि ‘एबीसीडी’ या दोन चित्रपटांचा दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुजा आपल्या पुढील चित्रपटाचे चित्रीकरण कल्याणात करणार आहे. त्यासाठी डिसुजा यांनी पालिकेकडून १२ दिवसांची परवानगी घेतली आहे.
या चित्रीकरणासाठी रेमो डिसुजा महापालिकेला दिवसाला २५ हजार रुपए मोजणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत 3 लाख रुपए जमा होणार आहेत. कल्याण- डोंबिवली आता हिंदी चित्रपट निर्मात्यांना खुणावत असून चित्रीकरणाच्या माध्यमातून पालिकेला उत्पन्नाचा नवा मार्ग मिळाला आहे.

शहरात अनेकदा हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र चित्रीकरणासाठी यापूर्वी पालिकेची कधीही परवानगी घेण्यात आली नव्हती. अनेकदा चित्रीकरण होऊनही पालिकेने रॉयल्टी मिळावी यासाठी दावा केला नव्हता.

पीयुष डान्स अ‍ॅकॅडमी ने मे महिन्याच्या अखेरीस पालिका क्षेत्रात चित्रीकरण करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी मिळण्यापूर्वीच त्यांनी चित्रीकरणाचे काम सुरू केले होते.

महापालिकेचे उपकरनिर्धारक संकलक संजय शिंदे यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चा केली आणि चित्रीकरणासाठी महापालिकेतर्फे दिवसाला २५ हजार रुपयांप्रमाणे कर आकारला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने १२ दिवसांसाठी 3 लाख रुपयांची मागणी केली होती. निर्मात्यांकडून लवकरच ही रक्कम महापालिकेकडे जमा केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कल्याण खाडी एरिया, खडकपाडा सर्कल, गोदरेज सर्कल या परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात व्यावसायिक चित्रीकरणासाठी किती रक्कम आकारायची याबाबत महापालिकेची स्पष्ट नियमावली नव्हती. मात्र, आता नव्या कराची रक्कम ठरवण्यात आली आहे. त्यानुसार आता चित्रीकरणासाठी कर आकारला जाणार आहे.

मराठी चित्रपटांना सरकारस्तरावर सवलत दिली जाते. त्याप्रमाणेच मराठी चित्रपट निर्मात्यांना पालिकेकडून सवलत मिळणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर