चित्रपट सांगा बाजीराव चा संगीतमय मुहुर्त संपन्न



सांगा बाजीराव या मराठी चित्रपटाचा मुहुर्त नुकताच अंधेरीच्या सिटी स्टुडियोत संपन्न झाला. यावेळी संगीतकार संदिप डांगे यांनी टायटल टै्क चे रिकॉर्डिंग केले. 

माध्यम एन्टरप्राइजेस आणि राधाकृष्ण फिल्म्स निर्मित सांगा बाजीराव या मराठी चित्रपटाची निर्माती ऐश्वर्या आणि बाळासाहेब गोरे हे करत असुन चित्रपटाचे दिग्दर्शन ही बाळासाहेब गोरे करणार आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात उस्मानाबाद येथे चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. उस्मानाबाद, अमरावती, नाशिक आणि मुंबई येथे चार सत्रात चित्रपट पूर्ण करण्यात येणार आहे. या मध्ये एकूण तीन गाणी व एक टायटल टै्क आहे. संगीत संदीप डांगे, गीते सावता गवळी, छायांकन दिपक दुग्गल तर संकलक शंकर पांडे आहेत. या चित्रपटात देवदास डोंगरे, अली शेख, प्रकाश महाजन, स्मिता अर्चना तेंडुलकर, काजल किरण, पल्लवी पाटील, डि.एन.कोळी, प्रशांत गेलांडे, रोहण सवणे, रिया, पप्पू लाड, सुनिल निकम आणि प्रवीण वाडकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर