झी टीव्हीच्या डीआयडी सुपरमॉम्स मध्ये फुलवा


वाजले बारा, अप्सरा आली मध्ये कोरिओग्राफर आणि सचिन पिलगावंकर चा सुपरहिट डांसिंग शो 'एका पेक्षा एक मध्ये मेंटॉर आणि परीक्षक झाल्यानंतर फुलवा खामकर स्वतःच झी टीव्हीच्या डान्स इंडिया डान्स सुपरमॉम्स मध्ये स्पर्धक म्हणून नेशनल टेलीव्हिजन वर झलक दाखविण्यासाठी आता उतरली आहे. ऑडीशनचा एकेक टप्पा पार करत फुलवा या शोच्या अंतिम सोळा स्पर्धकांमध्ये पोहोचली आहे. बुगी वुगी या शोची विजेती ठरल्यानंतर फुलवा आता सुपरमॉमचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठीत दिग्गज म्हणून ओळखली जाणारी फुलवा हिंदी मध्ये ही आपल्या नृत्याचा अविष्कार नक्कीच दाखवून देईल, या बद्दल तरी काही शंकाच नको.

सुपरमॉम्समध्ये फुलवा खामकर स्पर्धक म्हणून सहभागी झाली. तसेच बुगी वुगी चीही मॉम्स स्पेशल सीझनची विजेती ठरली आहे. मराठीत नाव कमविल्या नंतरही हिंदीत स्पर्धक म्हणून सहभागी व्हायला अजिबात कमीपणा वाटत नसल्याचे फुलवा सांगते. मराठीत केलेलं काम लोकांपर्यंत पोहचलंय. पण, हिंदीत मी काहीच काम केलं नव्हतं. त्यामुळे नेशनल टेलिव्हिजनवर दिसण्याची आणि हिंदीत काम करण्याची ही माझी पहिली वेळ आहे, असे फुलवाने सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर