मालेगांव में गडबड घोटाला
मालेगांव मध्ये आतापर्यंत बॉलीवूड आणि हॉलिवूड
मध्ये गाजलेल्या चित्रपटांचा रिमेक होत होता. यामध्ये मालेगांव का सुपरमैन, मालेगांव के शोले, मालेगांव का करण
अर्जुन,
मालेगांव का गझनी या चित्रपटांनी तेथे तुफान यश मिळवले आहे. स्थानिक कलाकारांना
घेऊन लोकप्रिय चित्रपटांचा रिमेक बनवायचा व लोकल डिव्हीडी थिएटरमध्ये तो प्रदर्शित
करायचा असा यांचा धंदा चालत असे. आता स्थानिक पातळीवर काम करता-करताते मुख्य
प्रवाहात आले आहेत. ए टू झी प्रोडक्शनच्या बैनरखाली निर्माते इरफान शेख, आलिम शेख व
सहनिर्माते एस नझीर यांनी मिळून मालेगांव में गडबड घोटाला या हिंदी चित्रपटाची
निर्मिता केली आहे. या चित्रपटात अन्वर शेख यांचे दिग्दर्शन लाभले आहे. लवकरच हा
चित्रपट मुंबईसह संपूर्ण भारतभर मैक इंटरप्राइझेसच्या सहकार्याने प्रदर्शित होत
आहे.
मालेगांव में गडबड घोटाला हा विनोदी चित्रपट असून
या चित्रपटाची कथा ही मामा-भाच्यावर गुंफण्यात आले आहे. मामा शहरात असतो व भाचा हा
मालेगांव मध्ये. जेव्हा भाचा शहरात मामाकडे येतो तेव्हा त्याला आपला मामा हा
फसवा-फसवीची कामे करणारा आहे. हे समजते व तो निराश होऊन गावी परतण्याचा निर्णय
घेतो. जाताना त्याला अचानक करोडो रुपये असलेली बैग सापडते. त्यामुळे भाच्याला
काय-काय झेलावे लागते आणि कसा इतरांचा सामना करायला लागतो हे चित्रपटात पाहणेच
योग्य ठरणार आहे. या चित्रपटात आसिफ अलबेला, एस. नसीर, हेमंत बिरजे, हुमा कुरेशी आणि श्रद्धा मोरे यांच्या
महत्वपूर्ण भूमिका आहेत.
Comments