३ जूनपासून शिवसेनेच्या दणक्याने एकुलती एक ई-स्क़्वेअरमध्ये

मुंबई - काळानुसार मराठी सिनेमासुद्धा बदलतोय. चित्रपटाच्या विषयांमध्येसुद्धा वैविध्य पाहायला मिळत आहे. अनेक प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार मराठीत येत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकारसुद्धा मराठीत येत आहेत. पूर्वी लाखांमध्ये बनणारा मराठी चित्रपट आता कोटी-कोटीची उड्डाणे घेऊ लागला आहे. चित्रपट निर्माते नवीन तंत्रज्ञ, उत्तम संगीत त्याचबरोबर सिनेमाच्या प्रोमोशनवर मेहनत घेताहेत. अशातच मल्टीप्लेक्सवाल्यानी मराठी चित्रपट लावण्यास नकार देण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. आता सचिन पिळगावकर यांच्या “एकुलती एक” चित्रपटाला पुण्यातील ई-स्क़्वेअरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत होता. तरीही तेथील व्यवस्थापनाने हा चित्रपट काढण्याचे ठरविले. त्यामुळे शिवसेनेच्या चित्रपट शाखेने या प्रकरणी मध्यस्थी करताच पुन्हा हा चित्रपट लावण्याचे ठरविले आहे.

सचिन यांचा एकुलती एक” हा चित्रपट मागील आठवडयात प्रदर्शित झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगरमधील ई-स्क़्वेअरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. असे असताना या आठवडयात हा चित्रपट काढण्याचे ठरविले. ही बाब सचिन यांच्या लक्षात येताच त्यांनी ही गोष्ट शिवसेना सचिव,शिवसेना चित्रपट सेना अध्यक्ष-अभिनेता आदेश बांदेकर त्यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब तेथील व्यवस्थापनाशी संपर्क साधून या चित्रपटाला मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये प्रेंक्षक गर्दी करतायत, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तरीही मराठी चित्रपटावर अन्याय होत आहे. तो आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आदेश बांदेकर यांनी दिला. त्याबरोबर तेथील व्यवस्थापनाला जाग आली आणि त्यांनी तो चित्रपट पुन्हा सोमवार ३ जूनपासून लावण्याचे मान्य केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर