जश ने मानव गोहिल, गणेश आचार्य, कुमार व संगीतकार रोचक कोहली यांच्या उपस्थितित लॉन्च केला आपला नविन सिंगल ‘छल्ला डायमंड दा’ टीवी स्टार मानव गोहिल आणि डांस मास्टर गणेश आचार्य आता एकाच फ्रेम मध्ये एकत्र दिसत आहेत. त्याचं असे झाले कि अमेरिका येथील न्यू जर्सी मध्ये राहणारी सिंगर जश ने आपला नविन म्यूजिक वीडियो "छल्ला डायमंड दा" मुंबई मध्ये रिलीज़ केला, ह्या म्यूज़िक विडिओ मध्ये मानव गोहिल व कोरियोग्राफर गणेश आचार्य देखील नाचताना दिसत आहेत. ह्या वीडियोला संगीत दिले आहे रोचक कोहली ने व गाणं लिहिले आहे सुप्रसिद्ध गीतकार कुमार ने. जश च्या ह्या वीडियो चे दिग्दर्शन केले आहे लोकप्रिय डांस मास्टर गणेश आचार्य ने. ज़ी म्यूजिक कंपनी द्वारा रिलीज़ केलेल्या ह्या सिंगल सॉन्गच्या लॉचिंग वेळी जश सोबत मानव गोहिल, रोचक कोहली, गीतकार कुमार आणि गणेश आचार्य उपस्थित होते. येथे जश ने ह्या गाण्यावर लाईव परफॉर्म देखील केला व स्टेज वर गणेश आचार्य आणि मानव गोहिल ने तिला साथ दिली. हे सॉन्ग मिक्स करणारे आदित्य देव देखील येथे उपस्थित होते, तर पाहु्ण्यांमध्ये पवन शर्मा व संगीतकार मदन मोहन यांचे पुत्र समीर कोह...