हिंदी चित्रपट ‘ब्लू माऊंटन्स’ ला १९ व्या अंतरराष्ट्रीय बाल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार मिळाला
हैदराबाद मध्ये नुकताच १९ वा अंतरराष्ट्रीय बाल फिल्म फेस्टिवल संपन्न झाला व त्यामध्ये क्रिश मूवीज चे निर्माता राजेश कुमार जैन यांचा पहिला चित्रपट ‘ ब्लू माऊंटन्स ’ ला सर्वश्रेष्ठ फिल्म चा पुरस्कार मिळाला. ह्या चित्रपटाचे फार कौतुक करण्यात आले आहे. ह्या प्रतिष्ठित फिल्म समारंभात चित्रपट ‘ ब्लू माऊंटन्स ’ चे स्क्रिनिंग सुरु असताना टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. ह्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुमन गांगुली म्हणाले कि ‘ ब्लू माऊंटन्स ’ तर बदलत्या रंगा प्रमाणे आहे , जसे ऋतु बदलतात. चित्रपटात मानवाच्या भावना आणि प्रवासा मधील हारणे व जिंकण्याचे जीवन दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला गेला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर श्री राजेश जैन म्हणाले कि चित्रपट ‘ ब्लू माऊंटन्स ’ ला हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे , त्यामुळे आम्हांला स्फूर्ति मिळाली आहे. ह्या चित्रपटात मुलांचे आई-वडिल आणि कौटुंबिक मूल्यांवर जास्त जोर देण्यात आला आहे. मी ज्यूरी सदस्यांचे आभार मानतो , त्यांच्यामुळे आमचे प्रयत्न दर्शकांपर्यत पोहचविण्यास मदत मिळाली. त्याच बरोबर सर्व टीम मेंबर्स चे कौतुक क...