Aatpadi Night's cha presenters Actor Subodh Bhave
‘आटपाडी नाईट्स’ साठी सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. सुबोध आता पुन्हा एकदा नव्या इनिंग साठी सज्ज झाला असून तो ‘आटपाडी नाईट्स’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’, ‘... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ असे चरित्रपट असो की ‘तुला पाहते रे’ मधील खलनायकी छटा असलेला विक्रांत सरंजामे किंवा ‘अश्रूंची झाली फुले’ मध्ये रंगमंचावर बिनधास्त वावर असलेला लाल्या, माध्यम कोणतेही असो सुबोध भावेने प्रत्येक व्यक्तीरेखेला आपल्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अभिनेता म्हणून दमदार वाटचाल सुरु असताना त्याने चित्रपट दिग्दर्शनात पाउल टाकले आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकाला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर आणण्याची कामगिरी उत्तम निभावली. तर ‘पुष्पक विमान’ या चित्रपटातून निर्माता म्हणू...