Posts

Showing posts with the label #Law of Love

"लॉ ऑफ लव्ह" ९ एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहात येण्यासाठी सज्ज

शंकर मराठे - मुंबई, २५ नोव्हेंबर :  सध्या संपूर्ण जग हे इंटरनेटमुळे एकत्र आल्या कारणाने या लॉकडाऊनमध्ये देखील सर्वाना घरबसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती, आणि याच संधीचा फायदा घेत आगामी विविध मराठी सिनेमांच्या घोषणा होत गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मराठी चित्रपट "लॉ ऑफ लव्ह" चे टिझर पोस्टर आणि मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या  भेटीला आले होते. नेटकऱ्यांच्या उदंड प्रतिसादा नंतर आता निर्माता आणि अभिनेता जे. उदय त्यांचा "लॉ ऑफ लव्ह" हा  मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित करणार असल्याची घोषणा सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वरून करण्यात आली आहे. मोठ्या पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला सी.एस. निकम दिग्दर्शित " लॉ ऑफ लव्ह" सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे. पोस्टरवर झळकणारे दोन नवे चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहेत. लॉ ऑफ लव्ह हे नाव जसं हटके आहे अगदी तशीच त्याची कहाणी देखील हटके आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या...