प्रिया बेर्डेची लव्हस्टोरी
बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे ‘अमिताभ आणि रेखा’, ‘शाहरुख आणि काजोल, ‘सलमान आणि ऐश्वर्या’ ह्या जोड्या लोकप्रिय आहेत तश्याच मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा काही एव्हरग्रीन जोड्या आहेत. ‘दादा कोंडके आणि उषा चव्हाण’, ‘अशोक सराफ आणि निवेदिता जोशी’, ‘सचिन आणि सुप्रिया’ ह्यासारख्या लोकप्रिय जोड्यांनी मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या जोडीमध्ये अजून एक जोडी अशी होती ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरक्ष डोक्यावर घेतले होते. ती जोडी म्हणजेच ‘लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे’. ह्या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीवर तर राज्य केलेच पण हिंदी चित्रपटांमध्येही हि जोडी चमकली. चित्रपटांमध्ये चांगली केमिस्ट्री जमलेली हि जोडी नंतर खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र आली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण ह्यांनी एकत्र अनेक मराठी चित्रपटांत काम केले. ह्या जोडीने ‘अशी हि बनवा बनवी’, ‘रंगत संगत’, ‘डोक्याला ताप नाही’, ‘शेम टू शेम’, ‘कुठं कुठं शोधू मी तिला’, ‘नशीबवान’, ‘येडा कि खुळा’ ह्यासारख्या अनेक मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या जोडीने हिंदी चित्रपटातही एकत्र काम केले. ‘हम आपके है कौन’, ‘बेटा’, ‘अनारी’, ‘दिदा...