Posts

Showing posts with the label Zee TV

धार्मिक मालिका जय मल्हार

Image
मणी आणि मल्ल या उन्मत्त दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडत सप्तर्षींच्या पूजेत वारंवार विघ्न आणलं. त्रस्त सप्तर्षींच्या विनंतीनुसार महादेवांनी मार्तंड भैरवाचा अव तार धारण करून मणी आणि मल्लाचं पारिपत्य केलं. असुरांच्या त्रासापासून मुक्त झालेल्या सप्तर्षींनी महादेवांना भूतलावर वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानुसार मल्हारी मार्तंडाच्या म्हणजेच खंडोबाच्या रूपात महादेवांनी जेजुरी नगरीत वास केला. शिवभक्त तिम्माशेठ यांच्या अत्यंत अनुरूप कन्येचं – म्हाळसेचं स्थळ खंडोबासाठी चालून आलं. त्याच वेळी देवर्षी नारदांनी खंडोबांना बाणाई नावाची महादेवांची एक अत्यंत निस्मीम भक्त असल्याची माहिती दिली. खंडोबांची भेट आधी कोण घेईल - म्हाळसा आणि बाणाई ? झी मराठी वर धार्मिक मालिका जय मल्हार चे सोमवार ते शनिवार ७ वाजता प्रक्षेपित होत आहे.

झी टीव्हीच्या डीआयडी सुपरमॉम्स मध्ये फुलवा

Image
वाजले बारा, अप्सरा आली मध्ये कोरिओग्राफर आणि सचिन पिलगावंकर चा सुपरहिट डांसिंग शो 'एका पेक्षा एक मध्ये मेंटॉर आणि परीक्षक झाल्यानंतर फुलवा खामकर स्वतःच झी टीव्हीच्या डान्स इंडिया डान्स सुपरमॉम्स मध्ये स्पर्धक म्हणून नेशनल टेलीव्हिजन वर झलक दाखविण्यासाठी आता उतरली आहे. ऑडीशनचा एकेक टप्पा पार करत फुलवा या शोच्या अंतिम सोळा स्पर्धकांमध्ये पोहोचली आहे. बुगी वुगी या शोची विजेती ठरल्यानंतर फुलवा आता सुपरमॉमचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठीत दिग्गज म्हणून ओळखली जाणारी फुलवा हिंदी मध्ये ही आपल्या नृत्याचा अविष्कार नक्कीच दाखवून देईल, या बद्दल तरी काही शंकाच नको. सुपरमॉम्समध्ये फुलवा खामकर स्पर्धक म्हणून सहभागी झाली. तसेच बुगी वुगी चीही मॉम्स स्पेशल सीझनची विजेती ठरली आहे. मराठीत नाव कमविल्या नंतरही हिंदीत स्पर्धक म्हणून सहभागी व्हायला अजिबात कमीपणा वाटत नसल्याचे फुलवा सांगते. मराठीत केलेलं काम लोकांपर्यंत पोहचलंय. पण, हिंदीत मी काहीच काम केलं नव्हतं. त्यामुळे नेशनल टेलिव्हिजनवर दिसण्याची आणि हिंदीत काम करण्याची ही माझी पहिली वेळ आहे, असे फुलवाने सांगितले.