PRO Ganesh Gargote's Sir - Marathi Film Industries ke Mama Ashok Saraf
अशोक सराफ! सगळ्या इंडस्ट्रीचे मामा... मी मात्र नेहमी त्यांना ‘सर’ म्हणतो... २००४ साली त्यांची माझी ओळख झाल्यापासून आजतागायत ते कायम माझ्यासाठी 'सर'च राहिले... त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. देवकृपेने २००५ साली च ती पूर्ण झाली. चित्रपट होता, 'नवरा माझा नवसाचा!' त्यानंतर आजतागायत आमच्या अनेक भेटी झाल्या. कधी शूटिंगच्या निमित्ताने... कधी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने... कधी पुरस्कार सोहळ्यात... तर कधी फिल्मी पार्ट्यांमध्ये... त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध जुळले. ते कायमच विनोदी ढंगात बोलायचे, अनुभव सांगायचे. त्यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे ते तर मी प्रत्यक्ष बघतच होतो. त्या चाहत्यांचे काही किस्सेही ते आपल्या खुमासदार शैलीत सांगायचे. माझ्या मनात कायमच त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती असते. त्यामुळे मी आपण होऊन काहीच बोलत नाही कारण त्यात पण एक अतिशय लोभस नातं आहे. त्यांच्या सगळ्याच भूमिका त्यांनी अविस्मरणीय केल्या. मला मात्र ‘पांडू हवालदार’, ‘सुशीला’, ‘खरा वारसदार', 'अशी ही बनवाबनवी', 'एक डाव भुताचा' यातल्या त्यांच्या भूमिका खूप आवडल...