डॉ.विलास उजवणे बरोबर बॉलीवुड मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी चर्चा केली
० ‘डोम’ म्हणजे नक्की आहे तरी काय ?
- ‘डोम’ म्हणजे तसं एका वाक्यात सांगायचे झाले तर स्मशानात मढ येते आणि त्या मढ्याची म्हणजेच मयताची जो व्यक्ति संपूर्णपणे विलेवाट लावण्याचे काम करतो, त्यालाच डोम म्हणतात. हा व्यक्ति मयताची संपूर्णपणे जळेपर्यंत काळजी घेतो. कारण ह्याच अंतिम संस्काराच्या कामाबद्दल त्याची रोजची भाकरी पूर्णपणे अवलंबून असते.
० तुम्ही ३ वर्षानंतर ह्या सिनेमात दिसत आहे...
- मागील ३ वर्षें मी पैरेलिसिसच्या आजारापणात होतो व त्या आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर ‘डोम’ हा माझा पहिला सिनेमा प्रदर्शित होत आहे, जो २७ डिसेंबर रोजी सिनेमाघरात येणार आहे.
० ह्या सिनेमाचा क्लाइमेक्स सीन शूट करताना दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी फारच धावपळ करून घेतली, हे खरं आहे का ?
- शंकरराव, हे शंभर टक्के खरं आहे. दिग्दर्शक प्रदीप दळवी यांना क्लाइमेक्स सीन शूट करायचा होता व हा सीन शूट करताना मला एक मूल हातात घेऊन पळायचे होते, परंतु हा सीन चित्रित करताना डायरेक्ट साहेबांनी मला फारच पळविले. जोपर्यंत त्यांच्या मनासारखा सीन शूट होत नाही, तोपर्यंत ते रि-टेक करत राहिले. जेव्हा सीन परफेक्ट शूट झाला तेव्हा दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी सीन ओके असा जोरात आवाज दिला.
०‘डोम’ ह्या सिनेमांची सारांश मध्ये कथा काय आहे ?
- ‘डोम’ म्हणजे स्मशानात काम करणारा एक मजूर व मृत व्यक्तिचा त्यांचा नातेवाईकांबरोबर अंतिम संस्कार करण्यास मदद करतो आणि त्यांची रोजची भाकरी पूर्णपणे हया कामावर अवलंबून असते. परंतु त्यांची नवीन पिढी या परंपरेला पुढे नेण्यास नकार देते. ह्यामुळेच जुनी आणि नवीन पिढी यांच्यातील संघर्ष सुरु होतो. ह्या मध्ये एक लवस्टोरी देखील आहे, ती देखील बघण्यासारखी आहे. कारण ह्या लवस्टोरीमूळेच सिनेमात वादळ सुरु होते. आता हे वादळ कशा प्रकारचे आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही २७ डिसेंबर रोजी नक्की ‘डोम’ हा सिनेमा बघावा. मराठी चित्रपट ‘डोम’ एक धगधगतं आयुष्य आहे.
Comments