मारुती कांबळेचं काय झालं?’
सामना’देखील असाच श्रीराम लागूंच्या नावावरील लोकप्रिय चित्रपट. ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ हा अजरामर संवाद आज ४०-४५ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या कानात घुमतोय. या सिनेमात निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यातील संवादाची जुगलबंदी उभ्या महाराष्ट्राने पाहिली. ‘या टोपीखाली दडलंय काय’ हे या चित्रपटातील गीत आजही लागूंप्रमाणे तितकीच लोकप्रियता टिकवून आहे. त्यांनी मराठीसोबत अनेक हिंदी सिनेमांमधूनही अभिनय केला. सन १९७७ मध्ये आलेल्या ‘घरोंदा’मधील त्यांची भूमिका संस्मरणीय ठरली. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता.
Comments