Reel life Actor & Real life Docter the shreeram lagu
डॉ. श्रीराम लागू यांनी मराठीतील नाटक आणि चित्रपटांच्या आशयघन कथांना आपल्या कसदार अभिनयाने लोकप्रियतेची नवी उंची मिळवून दिली. लागूंनी उपजीविकेसाठी डॉक्टरकीचा पेशा निवडला खरा, पण तिथे त्यांनी आपली घुसमट होत असल्याचे अनुभवले. त्यांच्यात दडलेला अभिनेता त्यांना सतत अस्वस्थ करीत होता. डॉक्टरकी करीत नाटकांमधून समांतर अभिनय करण्याचा प्रयोग करीत स्वत:मधील अभिनेत्याला जिवंत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. आपण डॉक्टर किंवा अभिनेता यापैकी एकालाच न्याय देऊ शकतो, हे त्यांनी ताडले. त्यांनी डॉक्टरकीला सलाम ठोकत रंगभूमीला जवळ केले.
Comments