देव.....

" देव नसुन हा दगड आहे आणि देवाला रीटायर्ड करा " अशी घणाघाती वक्तव्य करणार्या डॉ.लागुंचा जन्म एका ब्राह्मण कुटूंबात झाला होता..त्यांच बालपणही मंदीराच्या परीसरातच गेल होत अस वाचनात आलय तरीही डॉक्टरांनी कायम अंधश्रध्दांचा कडाडून विरोधच केला..बालपणी त्यांना असे काय अनुभव आले असतील की त्यांचा देवा,धर्मावरुन विश्वास पुर्ण उडालेला होता..त्यांनी दिपा लागुंबरोबर लग्न केल तेंव्हा त्या ही खुप पुढारलेल्या वीचारांच्या होत्या..त्यांना एकुलता एकच मुलगा होता " तन्वीर " तो ऐन तारुण्यात येतानाच ट्रेनने प्रवास करत असताना कुणीतरी बाहेरुन भीरकावलेला दगड वर्मी बसुन हे जग सोडून गेला..तेंव्हा काही श्रध्दाळु लोकांनी " देवाचा अपमान केला म्हणुन ही जबर शीक्षा मीळालीय..त्याची काठी कुठे पडेल सांगता येत नाही..बापाच्या पापाची सजा मुलाला भोगावी लागली " अशा प्रकारची दुर्दैवी वक्तव्य केली होती पण तरीही लागु शांत राहीले..मुलाच्या नावाने त्यांनी एक पारीतोषीक जाहीर करुन ते दरवर्षी द्यायला सुरवात केली पण आपलं अंधश्रध्दा नीर्मुलनाच काम थांबवल नाही..आपण आयुष्यात थोडस जरी संकट आल तरी लगेच आपण केलेल्या, न केलेल्या चुकांची देवाच्या तसबीरी समोर माफी मागुन मोकळे होतो..पण डॉक्टर आपल्या वीचारांवर ठाम राहीले आणि लोक मात्र त्यांच्या आजाराचा संबंधही देवाच्या अपमानाशी जोडत राहीले..काल टि.व्ही.वर फोन वरुन श्रध्दांजली वाहाताना अशोक ( सराफ ) म्हणाला " रंगभुमी बद्दलची नीष्ठा आणि शीस्त मी त्यांच्या कडून शीकलो आणि ती मी कायम पाळत आलो " डॉक्टरांची देवापेक्षा कामावर आणि रंगभुमीवर जास्त नीष्ठा होती म्हणुनच ते बराच काळ रंगभुमी,चित्रपटा पासुन दूर असुनही आपल्याला त्यांच्या जाण्याच दू:ख झाल...

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर