लेखक जीत ज्ञान हे नाव परिचयाचे आहे , जीत ज्ञान एक चार्टर्ड एकाउंटेंट आहेत आणि दुबई मधील बेस्ड कंसल्टिंग ग्रुप जेसीए चे फाउंडिंग पार्टनर आहेत. सध्या ते दुबई येथे आपल्या कुंटुबात सोबत राहतात. त्यांचे पुस्तक "द थ्री यु टर्न्स ऑफ माई लाइफ" फारच लोकप्रिय झाले आहे आणि आता त्यांचे दुसरे पुस्तक "द थ्री वाइस मंकीज" हे चर्चेत आहे कारण ते मजेदार पुस्तक आहे . मुंबईत जेव्हा ह्या पुस्तकाचे विमोचन केले तेव्हा डायरेक्टर डेविड धवन , फराह खान आणि साजिद खान हे एकाच स्टेज वर आले होते. जीत ज्ञान बरोबर चर्चा केली. सादर करत आहे चर्चेचे मुख्य अंश ... प्रश्न : तुम्ही चार्टर्ड एकाउंटेट आहे , तर तुम्हाला कांदबरी लिहिण्याचा छंद कधी व कसा लागला ? जीत : हा एक मजेदार प्रश्न आहे. तसे पाहिले तर सीए चा जॉब व पुस्तकाच्या लेखकामध्ये काहीच तालमेल नाही आहे. परंतु पाच वर्षीपूर्वी जेव्हा मी चेतन भगत यांचे काही कांदब-या वाचल्या , तेव्हा मला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि मी माझे पहिले पुस्तक "द थ्री यु टर्न्स ऑफ माई लाइफ" लिहिले व त्याचे फारच कौतुक करण्यात आले. प्र...