"द थ्री वाइज मंकीज़" मी चित्रपटाच्या स्क्रीनप्ले सारखी लिहीली : जीत ज्ञान

लेखक जीत ज्ञान हे नाव परिचयाचे आहे, जीत ज्ञान एक चार्टर्ड एकाउंटेंट आहेत आणि दुबई मधील बेस्ड कंसल्टिंग ग्रुप जेसीए चे फाउंडिंग पार्टनर आहेत. सध्या ते दुबई येथे आपल्या कुंटुबात सोबत राहतात. त्यांचे पुस्तक "द थ्री यु टर्न्स ऑफ माई लाइफ" फारच लोकप्रिय झाले आहे आणि आता त्यांचे दुसरे पुस्तक "द थ्री वाइस मंकीज" हे चर्चेत आहे कारण ते मजेदार पुस्तक आहे. मुंबईत जेव्हा ह्या पुस्तकाचे विमोचन केले तेव्हा डायरेक्टर डेविड धवन, फराह खान आणि साजिद खान हे एकाच स्टेज वर आले होते. जीत ज्ञान बरोबर चर्चा केली. सादर करत आहे चर्चेचे मुख्य अंश ...

प्रश्न : तुम्ही चार्टर्ड एकाउंटेट आहे, तर तुम्हाला कांदबरी लिहिण्याचा छंद कधी व कसा लागला ?
जीत : हा एक मजेदार प्रश्न आहे. तसे पाहिले तर सीए चा जॉब व पुस्तकाच्या लेखकामध्ये काहीच तालमेल नाही आहे. परंतु पाच वर्षीपूर्वी जेव्हा मी चेतन भगत यांचे काही कांदब-या वाचल्या, तेव्हा मला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि मी माझे पहिले पुस्तक  "द थ्री यु टर्न्स ऑफ माई लाइफ" लिहिले व त्याचे फारच कौतुक करण्यात आले.

प्रश्न : तुम्ही तुमच्या दूस-या पुस्तकाचे विमोचन करण्यासाठी तीन मोठ्या दिग्दर्शकांना कसे काय तयार केले ?
जीत : मी मनापासून आभार व्यक्त करतो कि माझे पुस्तक रिलीज करण्यासाठी फराह खान, साजिद खान आणि डेविड धवन आले. एवढंच काय तर फराह खान आणि साजिद खान यांनी "द थ्री वाइज मंकीज़" ह्या पुस्तकाचे कवर ट्विटर वर रिलीज़ केले आहे. फराह आणि साजिद यांना माझे पुस्तक आवडले आहे. त्यांचे मोठेपण आहे कि त्यांने माझे पुस्तक लांच केले आणि माझे कौतुक करुन माझा उत्साह वाढविला.

प्रश्न : तुम्ही हया पुस्तकांच्या आधारे एखाद्या चित्रपटांची स्क्रिप्ट देखील तयार करु शकता ? असे तुम्हांला वाटते का ?
जीत : हे पुस्तक फारच मजेदार सिचुएशनल आहे आणि मी एखाद्या फिल्मी स्क्रीनप्ले सारखे हास्यमय लहान-लहान दृश्य लिहिली आहे, म्हणूनच मला असे वाटते कि एखादा दिग्दर्शक ह्याला चित्रपटांचे रुप देखील देऊ शकतो. डेविड धवन यांनी सांगितले कि हे पुस्तक वाचणार व कुठे तरी वापरण्याचा नक्कीच प्रयत्न करणार.

प्रश्न : हे पुस्तक कशा संदर्भात आहे ?
जीत : तसे पाहिले तर, माझे हे पुस्तक अमर, अकबर आणि अन्थोनी ह्या तिकडीच्या सभोवती फिरते. ही लोक एका ठिकाणी अडचणीत सापडतात आणि त्यानंतर सिचुएशन्स क्रिएट होती, हे तुम्हांला पुस्तक वाचल्यावरच समजेल. "बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो" सारखी फिलॉसॉफी न समजणारे, त्यांची चूक काय ? त्यांच्या कैरिअर वर कोणते संकट येईल आणि त्यांना तुरुंगात पाठविले जाईल ?, किवां पुन्हा एक वेळ नसीबाची देवी त्यांच्यावर मेहरबान होईल का ? हे सस्पेंस आता बोलू शकत नाही, कारण पाठकांना हे पुस्तक वाचल्यावर, त्यांना ह्यातील रहस्य कळणारच आहे.

प्रश्न : तुमची दोन्ही पुस्तकें इंग्रजी भाषेत आहेत, तर हिंदी पाठकांना देखील ही पुस्तकें उपलब्ध होतील का ?
जीत : नक्कीच, माझा प्रयत्न आहे कि ह्या दोन्ही कांदब-या हिंदी भाषेत भाषांतर करुन प्रकाशित करणे, त्यामुळे हिंदी पाठकांना देखील माझ्या रचना वाचता येतील.

प्रश्न : ह्या कांदबरी नंतर भविष्यातील नवीन योजना काय आहेत ?
जीत : तुम्हाला मी सांगू इच्छितो कि मी तीसरे पुस्तक देखील लिहिले आहे, परंतु त्याचे नाव अजून काही फाइनल केले नाही. तरी देखील मी आता इतकेच सांगू इच्छितो कि हे देखील एक सिचुएशनल कॉमेडी आहे आणि हे माझे तीसरे पुस्तक पुढच्या वर्षी प्रकाशित होईल. माझा प्रयत्न आहे कि मी प्रत्येक वर्षी माझ्या पाठकांना एक पुस्तक भेट देऊ इच्छितो.

प्रश्न : तुम्ही नवीन लेखकांना काय सल्ला देऊ इच्छिता ?
जीत : मला नवीन लेखकांना असा सल्ला द्यावा वाटतो कि त्यांनी जास्तीत-जास्त वाचन करावे, कारण तुम्ही जितके वाचन कराल, तितके तुम्हांला लिहिणे सोपे जाईल. आता पहा, मी मागील तीन महिन्यापासून फक्त वाचनच करत आहे, कारण वाचनातून आपल्याला लिहिण्याची प्रेरणा मिळते.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर