मराठी चित्रपट ‘खुशी’ ची संगीतमय सुरुवात



निर्माता अशोक भोंसले, माणिक मुंडे व धवल भद्रा आणि दिग्दर्शक सुभाष फडके यांचा नवा मराठी चित्रपट ‘खुशी’ ची दोन गाणी रिकॉर्डिंग करून संगीतमय सुरुवात झाली. चित्रपटाची कथा-पटकथा सुभाष फडके यांची आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार कांदबरी दानवे, विजय गीते, विक्रम गोखले, अशोक शिंदे, वृषाली विक्रम गोखले, नेहा गोखले, शुभांगी लिटके आहेत. संगीतकार मिलिंद जोशी व गीतकार माणिक मुंडे आहेत. गायक राहुल देशपांडे, ऋषीकेश कामेरकर आहेत.

चित्रपटांविषयी दिग्दर्शक सुभाष फडके म्हणाले कि भारतीय व पाश्चिमात्य संगीताच्या पृष्ठभूमि वर आधारित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटांचे चित्रिकरण पुणे, मुंबई व बैंकॉक येथे होणार आहे व १० सप्टेंबर पासून पुणे येथे शूटिंग सुरु होणार आहे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर