अक्षय कुमार बरोबर काम करण्याची इच्छा आहे – श्री राजपूत
मूळची गुजरात येथील, परंतु श्री राजपूत चे बालपण व शिक्षण मुंबई मध्येच पूर्ण झाले आहे. इकॉनॉमिक्स
आर्ट मध्ये ग्रेजुएशन चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वसाधारण मुली प्रमाणे श्री
एचडीएफसी बैंकेत कामाला लागली, परंतु तिच्या मनात एक्ट्रैस बनण्याची जिज्ञासा होती व तिची हिच इच्छा
तिली बॉलीवुडच्या ग्लैमर दुनियेत घेऊन आली. बॉलीवुडच्या ग्लैमरस दुनियेत प्रवेश
करताना श्री ला तिच्या घरच्यांनी विरोध केला होता, परंतु श्री ची इच्छे समोर घरचे देखील नरम पडले व
श्री ने बॉलीवुडच्या ग्लैमरस दुनियेत पर्दापण केले.
केशयोग
हर्बल ऑइल, पैनासोनिक, जीन्स,
साड़ी,
इयरिंग,
ब्राइडल ज्वेलरी आणि नाईट सूट सारख्या जाहिराती मधून श्री राजपूत चे फोटो
पाहिले असाल. मागील दोन वर्षात श्री ने जवळ-जवळ ३०० हून अधिक प्रिंट, कमर्शियल प्रोडक्ट व टीवी एड शूट केल्या आहेत. श्री ने एक्टिंग
व डांस ची ट्रेनिंग
कर्म कला मंच थिएटर ग्रुप कडून घेतली आहे. एड शूटच्या वेळी श्री ला विचारले कि तू
सिनेमा किवां टीवी मालिकेत काम का करत नाही - तेथे तुला जास्त स्कोप
आहे. श्री ने सांगितले कि - संधी मिळाली तर
नक्की करेन आणि काहीच महिन्यात
अरबाज़ खान सोबत ‘पारस पान मसाला’ ची एड शूट करण्याची संधी मिळाली. त्यानंतर वत्सल सेठ सोबत लाइफ
ओके ची सीरियल ‘रिश्तों का
सौदागर –बाज़ीगर’ देखील केली. ह्या सीरियल मध्ये श्री ने नैना चे कैरेक्टर प्ले
केले आहे, विवाहित असून एक्स्ट्रा लव-अफेयर करत असते.
कर्म
कला मंच थिएटर ग्रुप बरोबर ‘एक नन्ही चीक’ व ‘जिंदा लाश’ सारख्या सामाजिक संदेशात्मक नाटकांतून
श्री ने काम केले आहे. नाटक ‘एक नन्ही चीक’ भ्रूण हत्या वर आधारित आहेत तर जिंदा लाश’ हा ड्रामा एचआईवी सारख्या ज्वलंत विषयावर आधारित आहे. दोन्हीं
नाटकांतून काम करताना श्री ला समाधान मिळते.
बॉलीवुड़
च्या दुनियेत नाव कमविण्याची इच्छा मनात होती व आता श्री राजपूत चा पहिला हिंदी
सिनेमा ‘मिस खिलाड़ी – परफेक्ट मर्डर’’
१४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमाबद्दल श्री सांगते कि हा माझा
प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा आहे,
परंतु मी ‘गन्स ऑफ गुजरात’
हा चित्रपट पहिला साईन केला होता. चित्रपट ‘मिस
खिलाड़ी – परफेक्ट मर्डर’ मध्ये सोनल चा रोल साकार केला आहे, जी एक पावरफुल व धडाकेबाज पोलिस ऑफिसर आहे. मी पोलिस ऑफिसर
आहे तर चित्रपटांच्या कथानकानूसार एक मर्डर होतो आणि त्या खूनाची इन्वेसिटीगेशन
करताना प्रत्येकांवर संशय घेत असते व त्यापुढे काय होते, ते तुम्ही चित्रपटांतच पहा,
कारण हा सिनेमा १४ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
श्री
ने चित्रपट ‘गन्स ऑफ गुजरात’
बद्दल सांगितले कि ह्या चित्रपटांची कथा गुजरात मध्ये झालेल्या टेरिस्ट अटैक्ट वर
आधारित आहे आणि मी एटीएस मेंबर ची भूमिका साकारली आहे. ही भूमिका दमदार व रूबाबदार
स्वरुपाची आहे.
एवढेच
नाही तर श्री ‘इश्क दा खूटा’ सारखा कॉमेडी सिनेमा देखील करत आहे.
ह्या चित्रपटांची कथा रोमांटिक आहे. ह्या बद्दल श्री सांगते कि घर लहान आहे आणि
घरांतील प्रत्येक जण रोमांस करायला बघत आहे. नव-विवाहित जोडप्याला पहिले हनिमून
करण्यासाठी काय-काय खटाटोप करावा लागतो आणि ह्या चक्कर मध्ये जबरदस्त कॉमेडी होऊन
जाते. सर्वसाधारण कुंटुंबासारखी ही देखील एक जॉइन्ट फैमिली आहे आणि प्रत्येकजण
रोमांटिक प्रेमाचे चाळे करत असतो.
श्री
ची चित्रपटांतून दमदार व पावरफुल रोल साकारण्याची इच्छा आहे व खिलाडीयों के
खिलाड़ी अक्षय कुमार सोबत काम करण्याची मनापासून इच्छा आहे. एवढचं नाही तर स्मिता
पाटील चा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन बॉलीवुडच्या चित्रपटांतून चांगले रोल साकारून
टॉपची अभिनेत्री बनायचे आहे.
Comments