बॉलीवुड मध्ये करियर बनविण्याच्या एकमेव उद्देशाने मुंबईनगरी मध्ये दरवर्षी हजारों तरुण-तरुणी येतात व आपले भाग्य फिल्मी दुनियेत अजमवितात. अशाच एका तरुणी ने बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पदार्पण केले आहे. ह्या बोल्ड एंड ग्लैमरस तरुणीचे नाव आहे स्वाती घाटकर. स्वाती घाटकर मूळची आहे औरंगाबाद येथील , परंतु शालेय व कॉलेज चे शिक्षण मुंबई नगरीत झाले आहे. त्याचबरोबर लहानपणापासून एक्ट्रैस बनण्याचे स्वप्न जणू काही स्वाती पहातच होती. म्हणूनच आता स्वाती ने करियर बनविण्याच्या दृष्टीकोनातून अभिनयाचे क्षेत्र निवडले आहे . फिल्मी दुनियेत आता स्वाती जोरदार एंट्री करत आहे , परंतु ह्या अगोदर स्वाती ने आपला ग्लैमरस जलवा मॉडेलिंगच्या दुनियेत दाखविला आहे . आतापर्यंत स्वाती ने बैली वॉटर , स्टार विक मैग्जीन , मायापुरी मैग्जीन साठी मॉडेलिंग केले आहे. स्वातीचा बॉलीवुड मधील आवडता एक्टर सलमान खान व रामचरण आहे तर एक्ट्रैस रेखा , जुही चावला , माधुरी व विद्या बालन आहे. स्वातीला हिंदी-मराठी चित्रपटातून ग्लैमरस , रोमांटिक , एक्शन व कॉमेडी रोल करण्याची इच्छा आहे ...