स्वाती बनणार बोल्ड एंड ग्लैमरस हीरोईन


बॉलीवुड मध्ये करियर बनविण्याच्या एकमेव उद्देशाने मुंबईनगरी मध्ये दरवर्षी हजारों तरुण-तरुणी येतात व आपले भाग्य फिल्मी दुनियेत अजमवितात. अशाच एका तरुणी ने बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पदार्पण केले आहे. ह्या बोल्ड एंड ग्लैमरस तरुणीचे नाव आहे स्वाती घाटकर.
 
स्वाती घाटकर मूळची आहे औरंगाबाद येथील, परंतु शालेय व कॉलेज चे शिक्षण मुंबई नगरीत झाले आहे. त्याचबरोबर लहानपणापासून एक्ट्रैस बनण्याचे स्वप्न जणू काही स्वाती पहातच होती. म्हणूनच आता स्वाती ने करियर बनविण्याच्या दृष्टीकोनातून अभिनयाचे क्षेत्र निवडले आहे.

फिल्मी दुनियेत आता स्वाती जोरदार एंट्री करत आहे, परंतु ह्या अगोदर स्वाती ने आपला ग्लैमरस जलवा मॉडेलिंगच्या दुनियेत दाखविला आहे. आतापर्यंत स्वाती ने बैली वॉटर, स्टार विक मैग्जीन, मायापुरी मैग्जीन साठी मॉडेलिंग केले आहे.
 
स्वातीचा बॉलीवुड मधील आवडता एक्टर सलमान खान व रामचरण आहे तर एक्ट्रैस रेखा, जुही चावला, माधुरी व विद्या बालन आहे. स्वातीला हिंदी-मराठी चित्रपटातून ग्लैमरस, रोमांटिक, एक्शन व कॉमेडी रोल करण्याची इच्छा आहे व सध्या काही निर्मात्याच्या ऑफिस मध्ये जाऊन ऑडिशन देखील देत आहे. तर पाहू या ह्या ग्लैमरस दुनियेत स्वाती घाटकर कशा प्रकारचे ग्लैमरस एंड बोल्ड रोल साकारणार आहे व फिल्मी दुनियेत एक मानाचे स्थान बनविणार आहे.



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर