चित्रपट व्हॉट अबाऊट सावरकर ? चे म्युजिक लॉन्च



रिटेक अनलिमिटेड आणि औरस अवतार एंटरटेनमेंट निर्मित चित्रपट व्हॉट अबाऊट सावरकर ? चा गीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई स्थित मालाड लिंक रोड वरील स्वागत पार्क में संपन्न झाला. ह्यावेळी चित्रपटातील कलाकार, संगीतकार, गायक व सर्व तंत्रज्ञ उपस्थित होते. त्याचबरोबर ह्या संगीतमय कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे वाय.सी.पवार होते. चित्रपट व्हॉट अबाऊट सावरकर ? चे म्युजिक लॉन्चिग कार्यक्रमाबरोबर प्रमुख पाहुणे वाय.सी. पवार यांचा वाढदिवस देखील घूमधडाक्यात साजरा करण्यात आला. निर्माता अतुल परब व रोहित शेट्टी आहेत.
 
चित्रपटाचे लेखक नितिन गावडे आणि दिग्दर्शक रुपेश कटारे व नितिन गावडे आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकार शरद पोंक्षे, अविनाश नारकर, अतुल तोडणकर व इतर आहेत. 

ह्या चित्रपटात जयोस्तुते, जय शिवराया, वंदे मातरम, कोंकण सारखी मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत. गायक अवधुत गुप्ते, अभिषेक शिंदे, स्वप्निल बांदोडकर व वैशाली सामंत आहेत तर संगीतकार अभिषेक शिंदे व अवधुत गुप्ते आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर