हिंदी चित्रपट ‘लाखों हैं यहां दिलवाले’ ला ‘किस्मत’ चित्रपटाच्या निर्मात्याची नोटिस मिळाली
मुन्नवर भगत चा हिंदी चित्रपट ‘ लाखों हैं यहां दिलवाले ’ मध्ये एक नाही , तर एकूण ११ जुनी सुपरहिट गाणी आहेत , ते आता अडचणीत आले आहेत. पुरानी किस्मत च्या निर्मात्याने त्यांना गाण्यांच्या एनओसी साठी नोटिस पाठविली आहे. मुन्नवर भगत यांनी सारेगामा कडून सर्व गाण्यांची लिखित एनओसी घेतली आहे , परंतु किस्मत चे निर्माता त्यांच्याकडून पैशांची मागणी करत आहे. ह्यामुळेच मुन्नवर यांना चिंता वाटून राहिली आहे. चित्रपटांत वीजे भाटिया , कृतिया गायकवाड , आदित्य पंचोली यांनी काम केले आहे. चित्रपट ४ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे , परंतु किस्मत च्या निर्मात्यांनी मुन्नवर कडे गाणी वापरली म्हणून १० लाख रुपयांची मागणी केली आहे.