डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच समोरची गोष्ट गायब करणारे जादूगार नेमकं काय करतात हा फंडा शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतोच. पण शेवटी ते जादूगारच. त्यांच्या क्लुप्त्यांचा थांगपत्ता लागणं कठीण, पण त्यातच खरी मजा आहे. खरंतर ही कला आयुष्य म्हणून जगणाऱ्या एका व्यक्तीने जगावर आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. बंगालच्या गोड मिठाईचा गोडवा असलेले पी.सी.सोरकार यांनी जादुई दुनियेत ध्रुवासारखं अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा पद्मश्री पी.सी.सोरकार यांची नात मनेका सोरकार पुढे चालविण्यासाठी सज्ज झाली आहे, पी.सी.सोरकार (ज्यु) यांच्या तीन कन्यांपैकी मनेकाने हा वारसा पुढे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. द ग्रेट मॅजिशीयन म्हणून ओळखले जाणारे सोरकार यांनी लंडन पॅरिस, रोम, मॉसको, टोकियो अशी जगभर भ्रमंती करत त्यांनी भारताचं नाव रोशन केलं आहे. ४० टन जादूचे साहित्य, ३५ सहाय्यक, भन्नाट संगीत, क्षणार्धात घडणारी जादू या सगळ्याचं उत्तम मिश्रण पाहण्यासाठी पी.सी. सोरकार (ज्यु) यांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक आवर्जून उपस्थित राहतात. सोरकार घराण्याची नववी पिढी या सादरीकरणात उतरत असल्याने या शो...