Posts

Showing posts with the label #ashok saraf

अशोक सराफ नाट्य रसिकांसाठी फ्री मध्ये शो करणार

Image
  शंकर मराठे - मुंबई  २ जून २०२२  - झी मराठी वाहिनीवर सुरू कार्यक्रम किचन कलाकार मध्ये २ जूनच्या भागात अशोक सराफ व निवेदिता सराफ आले होते व त्यावेळी  ह्या   कार्यक्रमात जाहिरपणे अशोक सराफ यांचा वाढदिवस देखील साजरा केला, परंतु अशोक सराफ यांचा वाढदिवस ४ जूनला आहे. त्या निमित्ताने ४ जून रोजी अशोक  सराफ  नाट्य रसिकांसाठी फ्री मध्ये नाटकाचा एक शो करणार आहे.

अशोक सराफ म्हणाले सुनील गावस्कर चांगला नट आहे

Image
शंकर मराठे - मुंबई  1 जून 2022  - झी मराठी वाहिनीवर सुरू कार्यक्रम किचन कलाकार मध्ये १ जूनच्या भागात अशोक सराफ व निवेदिता सराफ आले होते व त्यावेळी  अशोक सराफ म्हणाले कि सुनील गावस्कर चांगला नट आहे व  सुनील गावस्कर बरोबर एका नाटकात लहानपणी काम केले आहे. ह्या नाटकात सुनील कृष्ण बनला होता तर मी बलराम बनलो होतो. सुनील ने फारच सुंदर अभिनय केला होता. हा किस्सा नवीन येणाऱ्या पुस्तकात देखील आहे. त्याचबरोबर ह्या  कार्यक्रमात जाहिरपणे अशोक सराफ यांचा वाढदिवस देखील साजरा केला. परंतु  अशोक सराफ यांचा वाढदिवस ४ जूनला आहे.

PRO Ganesh Gargote's Sir - Marathi Film Industries ke Mama Ashok Saraf

Image
अशोक सराफ! सगळ्या इंडस्ट्रीचे मामा... मी मात्र नेहमी त्यांना ‘सर’ म्हणतो... २००४ साली त्यांची माझी ओळख झाल्यापासून आजतागायत ते कायम माझ्यासाठी 'सर'च राहिले... त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. देवकृपेने २००५ साली च ती पूर्ण झाली. चित्रपट होता, 'नवरा माझा नवसाचा!' त्यानंतर आजतागायत आमच्या अनेक भेटी झाल्या. कधी शूटिंगच्या निमित्ताने... कधी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने... कधी पुरस्कार सोहळ्यात...  तर कधी फिल्मी पार्ट्यांमध्ये... त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध जुळले. ते कायमच विनोदी ढंगात बोलायचे, अनुभव सांगायचे. त्यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे ते तर मी प्रत्यक्ष बघतच होतो. त्या चाहत्यांचे काही किस्सेही ते आपल्या खुमासदार शैलीत सांगायचे. माझ्या मनात कायमच त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती असते. त्यामुळे मी आपण होऊन काहीच बोलत नाही कारण त्यात पण एक अतिशय लोभस नातं आहे. त्यांच्या सगळ्याच भूमिका त्यांनी अविस्मरणीय केल्या. मला मात्र ‘पांडू हवालदार’, ‘सुशीला’, ‘खरा वारसदार', 'अशी ही बनवाबनवी', 'एक डाव भुताचा' यातल्या त्यांच्या भूमिका खूप आवडल...