‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘ माझ्या बायकोचा प्रियकर ’ चे दिग्दर्शन केले आहे राजीव एस. रूईया. चित्रपटांच्या नावातच कथा लपलेली आहे. कॉमेडी शैलीची झलक व कौटुंबिक पृष्ठीभूमीवर कथा आधारित असून प्रेक्षकांना ह्या सिनेमात मनोरंजनाचा मसाला पहावयास मिळणार आहे. चित्रपटांतील कलाकार आहेत अनिकेत विश्वासराव , भाग्यश्री मोटे , अंशुमन विचारे , प्रिया गमरे , प्रियदर्शन जाधव , भारत गणेशपुरे , अनुपमा ताकमोघे , पदम सिंग , स्वाती व इतर. निर्माता आहेत प्रदिप के. शर्मा व दिपक रुईया. चित्रपटांत एकूण चार गाणी आहेत. एवढचं काय तर मीरा जोशी वर धमाकेदार आयटम सांग चित्रित केले आहे. चित्रपटांचे चित्रिकरण भोर व मुंबई मध्ये फिल्मसिटी येथे करण्यात आले आहे. चित्रपटांचे पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण होताच निर्मात्यांचा सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस आहे.