Posts

Showing posts with the label #item girl

मानसी नाईक म्हणतेय ‘आना रे....’

Image
महाराष्ट्राची डान्सिंग स्टार मानसी नाईक बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर जोरदार आगमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नार नवेली, फुल चमेली, ओठ गुलाबी तिची चाल शराबी’ असे तिचे वर्णन असलेले ‘आना रे.....’ हे आगामी ‘जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटातील नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. जुईली जोगळेकरचा स्वर लाभलेल्या या आवाजाला सोशल मिडीयावर तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. या चित्रपटातून अभिषेक साठे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत आहे. आजच्या तरुणाईचे प्रतिबिंब असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव (पाटील) आहेत. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एक हटके अशी हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मनोरंजना बरोबरच यातून एका सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेक साठे आणि केतकी नारायण यांच्यासह यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांब...

81 birthday of HELAN

बालिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सिनेमात एक हिरो आणि एक खतरनाक व्हिलन असायचा पण यात खंड पाडला तो अभिनेत्री हेलन यांनी. हेलन या एक अशा डान्सर होत्या ज्यांनी 50 व्या दशकातील सिनेमात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आज हेलन यांचा 81 वा वाढदिवस. बर्मामधून कोलकाता आणि मग मुंबईला पोहोचलेल्या हेलन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. हेलन यांचं पहिलं लग्न त्याच्याहून 27 वर्षांनी मोठे असलेले दिग्दर्शक एन. पी. अरोरा यांच्याशी झालं होतं पण त्यांच्या 35 व्या वाढदिवसालाच त्यांनी हे लग्न मोडलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात नवं वळण आलं आणि त्या लेखक सलीम खान यांच्या प्रेमात पडल्या. पण हेलन आणि सलीम यांची लव्ह-स्टोरी अजिबात सोपी होती.