81 birthday of HELAN
बालिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सिनेमात एक हिरो आणि एक खतरनाक व्हिलन असायचा पण यात खंड पाडला तो अभिनेत्री हेलन यांनी. हेलन या एक अशा डान्सर होत्या ज्यांनी 50 व्या दशकातील सिनेमात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आज हेलन यांचा 81 वा वाढदिवस. बर्मामधून कोलकाता आणि मग मुंबईला पोहोचलेल्या हेलन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. हेलन यांचं पहिलं लग्न त्याच्याहून 27 वर्षांनी मोठे असलेले दिग्दर्शक एन. पी. अरोरा यांच्याशी झालं होतं पण त्यांच्या 35 व्या वाढदिवसालाच त्यांनी हे लग्न मोडलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात नवं वळण आलं आणि त्या लेखक सलीम खान यांच्या प्रेमात पडल्या. पण हेलन आणि सलीम यांची लव्ह-स्टोरी अजिबात सोपी होती.
Comments