मूनवाइट फिल्म्स इंटरनेशनल फिल्म फेस्ट २०१९ मध्ये अनूप जलोटा, जस्पिंदर नरुला व डी वाई पाटिल उपस्थित होते
फिल्म फेस्टिवलच्या काळात हळू-हळू अजून एक फिल्म महोत्सव आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे, ज्याचे नाव आहे मूनवाइट फिल्म्स इंटरनेशनल फिल्म फेस्ट. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार व सिने निर्माता देवाशीष सरगम (राज) ह्याचे संस्थापक आहेत. ह्या फेस्टिवल चे आयोजन आता दुस-या वर्षी केले आहे, ज्याचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी मेट्रो आइनॉक्स मुंबई मध्ये त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगाल चे पूर्व गवर्नर डॉ डी वाई पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या वेळी भजन सम्राट अनूप जलोटा, सिंगर जस्पिंदर नरुला देखील उपस्थित होते.
मूनवाइट फिल्म्स इंटरनेशनल फिल्म फेस्ट २०१९ च्या जूरी मध्ये अनूप जलोटा, ब्राइट चे योगेश लखानी, आरजे राहत जाफरी, फिल्मकार सावन कुमार टॉक, सिंगर जस्पिंद्र नरुला व पंडित सुवशित राज सहभागी आहेत.
देवाशीष सरगम यांनी येथे भारत व विदेशांतील निर्माते-दिग्दर्शकांना आमंत्रित केले. ह्या फेस्ट मध्ये मीडिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि पद्मश्री अनुप जलोटा, पंडित सुवशित राज सारखे मान्यवर देखील उपस्थित होते. आइनॉक्स मेट्रो मल्टीप्लेक्स स्क्रीनिंग पार्टनर व ब्राइट आउटडोर मीडिया पार्टनर आहेत. ह्या समारंभात दोन डजनाहून जास्त सिनेमे दाखविले जाणार आणि काही चित्रपट सम्मानित केले जाणार. येथे आलेल्या सर्व लोकांना देवाशीष यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या. हे उल्लेखनीय आहे कि देवाशीष यांना म्यूजिक फारच आवडते आणि टी-सीरीज द्वारा रिलीज त्यांच गाणं ‘खत किसी और के नाम’ लोकांना फारच पसंत आले आहे आणि त्यांनी लाखों लोकांच्या ह्द्यात आपली जागा बनविली आहे.
अनूप जलोटा यांनी ह्या वेळी मीडिया बरोबर वार्तालाप करताना सांगितले कि मागच्या वर्षी देखील आम्ही लोकांनी ह्या फेस्टिवल चे आयोजन केले होते, ज्याला फारच चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. ह्यामध्ये भरपूर नवीन आणि प्रतिभावंत निर्माता-दिग्दर्शक-कलाकारांनी कैरियर बनविण्याची संधी मिळते, क्रिएटिव रुपाने प्रोत्साहित केले जाते. अशा प्रकारे फेस्टिवल मध्ये भरपूर दर्शक हे सिनेमे पाहतात, त्यानंतर सिनेमांना एवार्ड देखील दिले जातात आणि त्यामुळे ह्या सिनेमांची एक प्रकारे मार्केट वैल्यू वाढते.
अनूप जलोटा यांनी पुढे बोलताना सांगितले कि हा तीन दिवसाचा फिल्मी उत्सव आहे, जो १५ ते १७ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. ह्यामध्ये डॉक्यूमेंट्री, शॉर्ट फिल्में व फीचर फिल्में दाखविली जाणार आहे. मी नव-नविन सिंगर्सला कोऑपरेट करतो, मी सिने निर्माता आहे, तर नविन सिनेमे बनविणा-यांना सपोर्ट करणे देखील माझे कर्तव्य आहे. "प्यार तो होना ही था" फेम सिंगर जसपिंद्र नरुला यांनी येथे म्हणले कि मी चित्रपट पाहिले आहे आणि मी ह्या सिनेमांचे सब्जेक्ट आणि मेकिंग पाहून आश्चर्यचकित आहे.
Comments