तानाजी मालुसरेची बायको बनली काजोल
शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला.
तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. यामध्ये तान्हाजींच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण, उदयभान राठोडच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकरने साकारली आहे.
तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच सावित्रीबाईंच्या भूमिकेमध्ये काजोलची झलकही या ट्रेलरमध्ये पहायला मिळाली.
मंगळवारी सोशल नेटवर्किंग साईटवर याच ट्रेलरची चर्चा दिसून आली. मुंबईमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी कलाकारांनी संवाद साधला.

Comments