दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा सिनेमा ‘खली बली’ मधील टाइटल ट्रैकसाठी कोरियोग्राफ करण्यासोबत त्यामध्ये अभिनय देखील केला गणेश आचार्या यांनी
बॉलीवुडचे सुप्रसिद्ध मशहूर कोरियोग्राफर गणेश आचार्या यांनी दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा अपकमिंग हॉरर कॉमेडी सिनेमा ‘खली बली’ साठी टाइटल ट्रैक शूट केला. मुंबई मधील एंजेल स्टूडियो मध्ये हे स्पेशल गाणं कायनात अरोड़ा आणि गणेश आचार्यावर चित्रित केले गेले. एवढंच काय तर ह्या गाण्यामध्ये स्वतः गणेश आचार्या देखील डांस करताना दिसणार आहे. चित्रपटांचे निर्माता कमल किशोर मिश्रा आहेत. सिनेमा ‘खली बली’ हा वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शंस आणि प्राची मूवीजच्या बैनर खाली निर्मित होत आहे. ह्या सिनेमांतील कलाकारांमध्ये धर्मेंद्र, मधु, रजनीश दुग्गल, कायनात अरोरा, रोहन मेहरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे, बृजेन्द्र काला, यासमीन ख़ान, असरानी आणि एकता जैन आहेत. ह्या सिनेमांत मधु ब-याच कालावधीनंतर कम बैक करत आहे. कोरियोग्राफर गणेश आचार्या यांनी येथे मीडिया बरोबर वार्तालाप करताना सांगितले कि मी संजय लीला भंसाली यांचा सिनेमा ‘पद्मावत’ साठी ‘खली बली’ गीत कोरियोग्राफ केले होते, त्यावर रणवीर सिंग ने जबरदस्त डांस केला होता. आता दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा अपकमिंग सिनेमा ‘खली बली’ साठी टाइटल ट्रैक मी कोरियोग्रा...