सिद्धांत इस्सर हिंदी चित्रपट 'लास्ट डील' द्वारे पर्दापण करत आहे.
पुनीत इस्सर यांचा पुत्र सिद्धांत इस्सर हिंदी चित्रपट 'लास्ट डील' द्वारे पर्दापण करत आहे. चित्रपटांच्या ऑफिशियल घोषणेच्या फंक्शन मध्ये गणेश आचार्या सोबत अनेक सेलिब्रिटीं सहभागी झाले महाभारत मधून दुर्योधन बनुन नावलौकिक मिळविणारे फिट आणि फाइन अभिनेता-दिग्दर्शक पुनीत इस्सर ने काही सिनेमांतुन वेगवेगळे रोल उत्कृष्टपणे साकारले आहेत. सलमान खान अभिनीत सिनेमा 'गर्व' चे दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. आता पुनीत इस्सर यांचा पुत्र सिद्धांत इस्सर हिंदी चित्रपट 'लास्ट डील' द्वारे बॉलीवुड मध्ये आपल्या अभिनय कैरियरची सुरूआत करत आहे. मुंबई स्थित रहेजा क्लासिक क्लब मध्ये हया सिनेमांची ऑफिशियल घोषणा केली गेली, तेव्हा सिद्धांतला आशीर्वाद देण्यासाठी त्याचे पिता सोबत अनेक सेलिब्रिटीं सहभागी झाले होते. त्यामध्ये सुप्रसिद्ध कोरियोग्राफर व डायरेक्टर गणेश आचार्या, कॉमेडियन एहसान कुरैशी, गूफी पेंटल, पवन कौशिक, ब्राइट चे योगेश लखानी पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुनीत इस्सर ने क्लैप देऊन ह्यांची ऑफिशियल सुरुवात केली. ह्या क्राईम थ्रिलर हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक राजेश के रा...