टिक टॉक स्टार अरिश्फा खान व अदनान शेख यांचा म्यूज़िक वीडियो "डायमंड रिंग" लॉन्च " डायमंड रिंग" च्या रुपात अजून एक सिंगल रिलीज़ झाला आहे , त्यामध्ये टिक टॉक स्टार अरिश्फा खान व अदनान शेख दर्शकांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. हे दोन्ही कलावंत ह्या नवीन संगीत वीडियो मध्ये एकमेंकासोबत रोमांस करताना दिसत आहे. हा म्यूज़िक विडिओ मनोज लखानी यांनी प्रोड्यूस केला आहे , त्यांनी आपली म्यूज़िक कम्पनी व्हाइट बिलियनेयर रेकॉर्ड्स द्वारे रिलीज़ केला आहे. मुंबई स्थित अमेथिस्ट लाऊंज मध्ये काही दिवसापूर्वी भव्य-दिव्य रूपात हा लॉन्च सोहळा संपन्न झाला , त्यावेळी एलबमशी संबंधित सर्व लोक आणि संपूर्ण मीडिया जबरदस्त गर्दीने उपस्थित होता. तसे पाहिले तर सोशल मीडिया वर अरिश्फाच्या चाहत्यांची संख्या तर लाखों मध्ये आहे आणि अदनान देखील प्रख्यात टिक टॉक स्टार आहे. अदनान फैज़ू हा टीम 07 चा भाग आहे. सिंगल लॉन्चच्या वेळी संगीतकार नदीम-श्रवण यांच्या जोडीतील श्रवण राठौड़ यांचा म्यूज़िक डायरेक्टर पुत्र संजीव दर्शन , एजाज खान , टिक टॉक स्टार्स फैजू , हसनैन , शाम , आवेज दरबार ...