‘आपसे प्यार हो गया’ म्यूजिक वीडियो चे चित्रिकरण संपन्न

लाफिंग कलर्स इंटरटेनमेंट च्या बैनर खाली निर्मित ‘आपसे प्यार हो गया’ नामक गाण्याच्या म्यूजिक वीडियोचे चित्रिकरण संपन्न झाले. ह्या म्यूजिक वीडियो मध्ये प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल व गजल गायक जसवंत सिंग यांच्या आवाजात एक रोमांटिक गाणं चित्रित करण्यात आले. अनुराधा पौडवाल आणि जसवंत सिंग ने देखील ह्या म्यूजिक वीडियो मध्ये अभिनय केला आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये अभिनेता गौतम सूरी, अभिनेत्री उर्वशी परदेशी व दिवाकर ध्यानी ने देखील काम केले आहे.

जसवंत सिंग यांच्या संगीत दिग्दर्शनात तयार हे गाण राजकुमार ‘अंजुम’ ने लिहिले आहे आणि ह्याची खास बाब ही आहे कि ह्यामध्ये पहिल्या वेळी गजल सोबत रैप म्यूजिक देखील आहे, जी संगीत क्षेत्रात एक नवीन प्रयोग आहे.  गायक व संगीतकार शांतनु गुप्ता ने ह्या म्यूजिक वीडियो मध्ये फक्त रैप गायले नाही तर ह्यात अभिनय देखील केला आहे.

गजल गायकी मध्ये अनुराधा पौडवाल व जसवंत सिंग दहा वर्षीनी ह्या गाण्यांच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले आहे.

ह्या रोमांटिक म्यूजिक वीडियो चे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रभाकर शुक्ला ने केले आहे, प्रभाकर शुक्ला ने आतापर्यंत चारशे हून जास्त जाहिरातीपटाचे दिग्दर्शन केले आहे, त्याचबरोबर त्यांनी फीचर फिल्म व शॉर्ट फिल्मचे देखील दिग्दर्शन केले आहे.

‘आप से प्यार हो गया’ नावाच्या ह्या गाण्यांवर सर्व कलाकारांनी सदाबहार अभिनय केला आहे, हे एक खास स्टाइलचे गाणं आहे, ज्यात मेलोडी सोबत आजच्या युवा पिढीची देखील आवड ध्यानात घेतली आहे.

लाफिंग कलर्स इंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत हा म्यूजिक वीडियो लवकरच रिलीज़ होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर