पूनम कौर ने करण सिंग ग्रोवर सोबत चित्रपट ‘3 देव’ मधून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले.

दक्षिणेकडील सनसनीखेज पूनम कौर ने बॉलीवुड़ मध्ये चित्रपट ‘3 देव’ मधून टेलीविजनचा सुपरहिट स्टार करण सिंग ग्रोवर सोबत पर्दापण केले आहे. दिग्दर्शक अंकुश भट्ट चा कॉमेडी चित्रपट ‘3 देव’ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

साउथ मध्ये तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील २० पेक्षा अधिक चित्रपटांतून पूनम ने आपलीअभिनय प्रतिभा दाखविली आहे. पूनम आता साउथ मध्ये सर्वात प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे. एवढंच काय तर पूनमचा फेसबुक फॉलोअर्स ५ मिलियन पर्यंत पोहचला आहे, त्यामुळे ती फारच लोकप्रिय झाली आहे. सध्या ती तेलुगू ऐतिहासिक टीव्ही सीरिज‘स्वर्ण खडगम’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे, ही मालिका बाहुबली चे मेकर्स बनवित आहे.

पूनमची सुंदरता आणि स्मित डोळयांची तुलना नेहमीच मधुबाला आणि दिव्या भारती यांच्याशी केली जाते. दिल्ली मधून फैशन टेक्नोलोजी मध्ये शिक्षण घेतले आहे, ती ग्लॅमरच्या दुनियेत नवीन नाही आहे. चित्रपटांत प्रवेश करण्यापूर्वी पूनम ने मिस आंध्रचा मुकुट मिळविला होता कारण तीने लक्स मिस आंध्र ब्यूटी पेजेंट जिंकला होता.

त्यानंतर, तिने फेमिना मिस इंडिया साऊथ मध्ये मिस टेलेन्टेड पुरस्कारय मिळवला आणि दक्षिण मध्ये फिल्मफेअर बेस्ट सपोर्टींग एक्ट्रैस साठी अनेक वेळा नामांकन केले आहे.

‘3 देव’ मध्ये, पूनम ने राधाचा रोल साकारला आहे, तर करण सिंग ग्रोव्हर सोबतचे निकम्मा हे गाणं YouTube वर फारच लोकप्रिय होत चालले आहे..
https://www.youtube.com/watch?v=90KwV7Q50Lc

चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश भट्ट म्हणतात, "जेव्हा आम्ही भूमिकासाठी कास्ट करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझे कास्टिंग डायरेक्टर ने पूनमचे नाव सुचविले होते. आम्हाला चंचल, स्विट आणि बबली राधा पाहिजे होती, जी फारच भावुक देखील असावी आणि राधाच्या रोल साठी ती एकदम परफेक्ट होती. साउथ मधील तिचा अनुभव फारच उपयोगी आला. तिला रोल बद्दल जास्त काही सांगण्याची आवश्यकता भासली नाही आणि ती पूर्णपणे कैरेक्टर बरोबर एकरूप झाली. "

पूनम ने बॉलीवुड मध्ये पदार्पण करताना फारच मेहनत घेतली आहे. तीचे कैरेक्टर फारच मनोरंजक आहे, जे साकारणे इतकं सोपं नव्हते, परंतु एक आव्हान देखील होते. त्याचबरोबर चित्रपटांतील टीम ने फारच सहकार्य केले. आता सिनेमा रिलीज होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि आता देवचं काही तरी जादू नक्कीच दाखवेल, वाट पहात आहे.’ ती उत्साहाने सांगते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर