सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर, मराठी चित्रपट ‘सोहळा’ चा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यासाठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.

अरिंहत फिल्म प्रोडक्शनच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ चे प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहेत. नुकताच जुहू स्थित सी प्रिन्सेस होटेल मध्ये ह्या सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यात आला. सचिन  पिळगांवकर , विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर, यांच्या सोबत झी ईटीसी बॉलीवुड बिजनेस चे कोमल नाहटा ने सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच केला. त्यावेळी चित्रपटांतील सर्व कलाकार उपस्थित होते. के सी बोकाडिया यांनी मिडिया बरोबर बोलताना सांगितले कि हा माझा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे. एका आगळ्या-वेगळ्या संवेदनशील विषयावर सिनेमा बनविला आहे. दर्शकांना नक्कीच आवडेल, ह्या बद्दल पूर्ण खात्री आहे. ह्या चित्रपटात सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळस्कर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, भारत गणेशपुरे व आस्था खामकर व अन्य आहेत. संगीतकार नरेंद्र भिड़े व कोरियोग्राफर फुलवा खामकर आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA