के सी बोकाडिया यांचा पहिला मराठी चित्रपट ‘सोहळा’ चा पोस्टर व ट्रेलर लांच
सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, शिल्पा तुलस्कर मराठी चित्रपट ‘सोहळा’ चा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यासाठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.
अरिंहत फिल्म प्रोडक्शनच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ चे प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहेत. नुकताच जुहू स्थित सी प्रिन्सेस होटेल मध्ये ह्या सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यात आला. सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर यांच्या सोबत झी ईटीसी बॉलीवुड बिजनेस चे कोमल नाहटा ने सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच केला. त्यावेळी चित्रपटांतील सर्व कलाकार उपस्थित होते. के सी बोकाडिया यांनी मिडिया बरोबर बोलताना सांगितले कि हा माझा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे. एका आगळ्या-वेगळ्या संवेदनशील विषयावर सिनेमा बनविला आहे. दर्शकांना नक्कीच आवडेल, ह्या बद्दल पूर्ण खात्री आहे. ह्या चित्रपटात सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळस्कर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, भारत गणेशपुरे व आस्था खामकर व अन्य आहेत. संगीतकार नरेंद्र भिड़े व कोरियोग्राफर फुलवा खामकर आहे.
के सी बोकाडिया यांनी सांगितले कि मी आतापर्यंत हिंदी भाषेत ३८ चित्रपट डायरेक्ट केले आहेत व इतर ही भाषेत चित्रपट बनविले आहे, परंतु माझा हा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे, जो हिंदी चित्रपटासारखाच दर्जेदार बनविला गेला आहे. कंटेन्टवाइज हा चित्रपट फारच अनमोल आहे, जो दर्शंकाना नक्कीच आवडेल. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी ह्यापुढे प्रत्येक वर्षी एक मराठी चित्रपट बनविणार आहे.
Comments