सचिन पिळगांवकर मराठी चित्रपट ‘सोहळा’ चा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यासाठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.


सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर मराठी चित्रपट ‘सोहळा’ चा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यासाठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.


अरिंहत फिल्म प्रोडक्शनच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ चे प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहेत. नुकताच जुहू स्थित सी प्रिन्सेस होटेल मध्ये ह्या सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यात आला. सचिन  पिळगांवकर , विक्रम गोखले, शिल्पा तुलस्कर यांच्या सोबत झी ईटीसी बॉलीवुड बिजनेस चे कोमल नाहटा ने सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच केला. त्यावेळी चित्रपटांतील सर्व कलाकार उपस्थित होते. के सी बोकाडिया यांनी मिडिया बरोबर बोलताना सांगितले कि हा माझा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे. एका आगळ्या-वेगळ्या संवेदनशील विषयावर सिनेमा बनविला आहे. दर्शकांना नक्कीच आवडेल, ह्या बद्दल पूर्ण खात्री आहे. ह्या चित्रपटात सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळस्कर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, भारत गणेशपुरे व आस्था खामकर व अन्य आहेत. संगीतकार नरेंद्र भिड़े व कोरियोग्राफर फुलवा खामकर आहे.

पत्रकारांशी बोलताना अभिनेता सचिन पिळगावंकर यांनी चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना म्हटले कि हया सिनेमात मी असा रोल साकार केला आहे कि जो मी आतापर्यंत साकारला नव्हता, म्हणूनच मला ह्या चित्रपटांत काम करताना जास्तच मजा आली. माझ्या अपोजिट शिल्पा तुळस्कर ने बायकोची भूमिका साकारली आहे व शिल्पा बरोबर ब-याच वर्षांनी एकत्र काम करताना फारच मजा आली. एवढचं काय तर ह्या चित्रपटांत माझे वडिल विक्रम गोखले आहेत व त्यांच्याबरोबर देखील काम करताना फारच मजा आली. दर्शकांना ह्या सिनेमातून नक्कीच काहीतरी पहावयास मिळणार आहे, ह्याबद्दल तर काही शंकाच नको. कारण लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ने एका आगळ्या-वेगळ्या विषयांवर सिनेमा बनविला आहे व तो दर्शकांना नक्कीच आवडेल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA