सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ ने २०१८ चा पाथ ब्रेकिंग सीरियलच्या रूपात गोल्ड एवार्ड जिंकला
धीरज कुमार, ज़ुबी कोचर, सुनील गुप्ता द्वारा निर्मित क्रिएटिव आई लिमिटेडची सुप्रसिद्ध मालिका ‘इश्क सुभान अल्लाह’ झी टीवी वर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे, मुंबईत एका शानदार समारंभात २०१८ चा ‘पाथ ब्रेकिंग’ सीरियल म्हणून गोल्ड एवार्ड मिळाला आहे.
गोल्ड एवार्ड प्राप्त करणा-या ह्या मालिकेची भारतात व विदेशांत खास करुन ट्रिपल तलाकच्या मुद्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. हा पुरस्कार धीरज कुमार सोबत मालिकेतील कलाकार ईशा सिंग (झारा), अदनान खान (कबीर), शिपसी राणा (रुकसार), अंजीता पुनिया (अलिना), आशुतोष सेमवाल (इमरान) आणि बाल कलाकार मोहम्मद तोशी (अमन) ने स्विकार केला.
निर्माता धीरज कुमार ने ‘इश्क सुभान अल्लाह’ बनविण्याची संधी प्रदान केल्याबद्दल झी टीवी चे आभार मानले. ह्या मालिकेने सर्व चैनलच्या टॉप ३ सीरियलमध्ये रेटिंग चार्टमध्ये आपली स्थिती कायम ठेवली आहे. त्यांनी संपूर्ण टीम लेखक-डेनिश जावेद, आइडेशन हेड-संध्या रियाज, क्रिएटिव डायरेक्टर-आशीष बत्रा, प्रोजेक्ट हेड-अज्जू शेख आणि देश-विदेशातील सर्व दर्शकांचे आभार मानले. प्रेक्षकांनी खरोखरच ह्या वेगळया मालिकेचे कौतुक केले आहे.
शेवटी धीरज कुमार यांनी आपली कंपनी क्रिएटिव आई लिमिटेडला गोल्ड एवार्ड सन्मान बहाल करण्याकरिता आभार मानले.
Comments