सह्याद्री पिक्चर्स आणि जम्पिंग टोमॅटो मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनर खाली निर्मित ‘डोम’ मराठी सामाजिक चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लाँच करण्यासाठी डॉ.विलास उजवणे, अंजली उजवणे, संजय शेजवळ, दिग्दर्शक प्रदीप दळवी आणि निर्माते प्रो. आर. एल. तांबे आणि रोहनदीप सिंग उपस्थित होते आणि खास पाहुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज भोंसले देखील उपस्थित होते. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रदीप दळवी यांनी केले आहे. सतीश साळवे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत. संदीप डांगे यांनी संगीत व पार्श्वसंगीत दिले आहेत, तर गीत लेखन प्रो. आर. एल. तांबे आणि विठ्ठल वाघ. राज कडूर (अन्ना) यांचे छायाचित्रण आणि संकलन सचिन नाटेकर यांनी केले. प्रशांत नाईक यांनी फाईटींगचे काम पहिले आहे आणि निकी बत्रा कोरिओग्राफर आहेत. हया चित्रपटातील कलाकार डॉ. विलास उजवणे, अंजली उजवणे, मोहन जोशी, ज्योती निसळ, आर एल तांबे, अनिता नाईक, संजय शेजवळ, दिप्ती धोत्रे, मयुरी कापडाणे, सुनील गोडबोले, मेघा घाडगे, प्रदीप पटवर्धन, अविनाश जाधव, गीतांजली कुलकर्णी, सतीश साळवे, निर्मला, बाळ कला...