पूजा चोप्रा आणि फरहान अख्तर यांना बीएमसी ने #एकचम्मचकम ह्या सार्वजनिक आरोग्य मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले गेले.




अमर गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एमसीजीएम, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ने गैर-संसर्गजन्य रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'एकचम्मचकम या अभियानाची घोषणा केली आहे.

बीएमसी ने अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर व अभिनेत्री-मिस वर्ल्ड ब्युटी, पूजा चोप्रा यांना ह्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले होते, कारण त्यांच्यामुळे पब्लिक हेल्थ कॅम्पेनला उत्तम प्रतिसाद मिळेल.

बीएमसी आयुक्त अजय मेहता म्हणाले, 'एकचम्मचकम ह्या मोहिमेमुळे लोकांना गैर-संसर्गजन्य रोगांची गंभीर स्वरुपाची जाणीव करून देणे आणि त्यांच्या रोजच्या जीवनात आहारातील बदलांची व व्यायामांची जाणीव करून देणे हाच हेतू आहे." अतिरिक्त बीएमसी आयुक्त, आय ए कुंदन यांनी सांगितले, "गैर-संसर्गजन्य हा एक मुख्य रोग आहे आणि त्याबद्दल माहिती करुन देणे आवश्यक आहे ".

'एकचम्मचकम -  सध्याची जलद जीवनशैली आणि सदोष खाण्याच्या सवयीमुळे जवळजवळ प्रत्येकजणाला गैर-संसर्गजन्य (एनसीडीएस) रोगांचा धोका असतो. आता तर तरुण वयोगटां मध्ये देखील, रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च रक्त शर्करा हे सामान्यतः दिसून येतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एनसीडीएस मधील अहवालाचा उदाहरण देताना फरहान अख्तर, ज्याला शारीरिक स्वास्थ्यासाठी विशेषतः ओळखले जाते,  ते असे म्हणतात, "भारतात जवळजवळ संसर्गजन्य रोगांमुळे 61% मृत्यू होत आहे. यापैकी हृदयविकारविषयक आजार (कोरोनरी हार्ट रोग, स्ट्रोक आणि हायपरटेन्शन) 45%, आहे, त्यानंतर श्वसनक्रिया संबंधी रोग (22%), कर्करोग (12%) आणि मधुमेह (3%) मध्ये योगदान करतात. आम्ही मीठ, साखर आणि तेलाचे सेवन कमी केल्यास हे सर्व रोग रोखले जाऊ शकतात. आपण आपल्या आहारापासून सक्रिय जीवनशैली राखू शकतो.
 

अभिनेत्री पूजा चोपडा म्हणाली, "आपण किती प्रमाणात मीठ, साखर आणि तेल खातो, हे पाहण्याची गरज आहे. शारीरिक निष्क्रियता आपल्यासाठी धोका आहे, जो आम्ही स्वत: साठी तयार केलेला आहे. 'एकचम्मचकम ह्या मंत्राचा अवलंब करा.

अमर गांधी फाऊंडेशन चे डॉ. भूपेंद्र गांधी म्हणतात, "दररोज 'एकचम्मचकम मीठ, साखर आणि तेलचा उपयोग केला पाहिजे, "हे सोपे आणि स्वत:साठी स्पष्टीकरण आहे. उदाहरण हे आहे की एखाद्या व्यक्तीच्या आहारात खूप सोडियम हानिकारक ठरू शकते. यामुळे रक्त द्रवपदार्थ ठेवते आणि यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण पडतो.

'एकचम्मचकम मूलतः 'अमर गांधी फाऊंडेशन' या नावाची गैर-लाभकारी 'द नेटवर्क' या कंपनीने मोहिम तयार केली होती. हया मागचा विचाराबद्दल रीता गुप्ता म्हणते की, "'एकचम्मचकम हा स्लोगन मोजता येण्याजोग्या आणि संस्मरणीय झाला पाहिजे." हा संदेश फारच जलद गतीने परिवर्तित होत आहे, जो फारच लहान घोष वाक्य आहे. सावधगिरी बाळगा आणि मीठ, साखर व तेलाचा वापर आहारात कमी करा. आजच सुरू करा. "


'एमसीजीएम'च्या सहभागा ने, हे आता शहरातील गैर-संसर्गजन्य आजारांविरूद्ध लढा देण्यासाठी आवाहन करत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA