"डायमंड रिंग" च्या रुपात अजून एक सिंगल रिलीज़ झाला
टिक टॉक स्टार अरिश्फा खान व अदनान शेख
यांचा म्यूज़िक वीडियो "डायमंड रिंग" लॉन्च
"डायमंड रिंग" च्या रुपात अजून एक सिंगल रिलीज़ झाला आहे, त्यामध्ये टिक टॉक स्टार अरिश्फा खान व
अदनान शेख दर्शकांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. हे दोन्ही कलावंत
ह्या नवीन संगीत वीडियो मध्ये एकमेंकासोबत रोमांस करताना दिसत आहे. हा म्यूज़िक
विडिओ मनोज लखानी यांनी प्रोड्यूस केला आहे, त्यांनी आपली म्यूज़िक कम्पनी व्हाइट बिलियनेयर रेकॉर्ड्स द्वारे
रिलीज़ केला आहे. मुंबई स्थित अमेथिस्ट लाऊंज मध्ये काही दिवसापूर्वी भव्य-दिव्य रूपात
हा लॉन्च सोहळा संपन्न झाला, त्यावेळी
एलबमशी संबंधित सर्व लोक आणि संपूर्ण मीडिया जबरदस्त गर्दीने उपस्थित होता. तसे पाहिले
तर सोशल मीडिया वर अरिश्फाच्या चाहत्यांची संख्या तर लाखों मध्ये आहे आणि अदनान देखील
प्रख्यात टिक टॉक स्टार आहे. अदनान फैज़ू हा टीम07 चा भाग आहे.
सिंगल लॉन्चच्या वेळी संगीतकार नदीम-श्रवण यांच्या जोडीतील श्रवण राठौड़ यांचा
म्यूज़िक डायरेक्टर पुत्र संजीव दर्शन, एजाज खान, टिक टॉक स्टार्स
फैजू, हसनैन, शाम, आवेज दरबार, फ़ैज़, नगमा
सहित काही गेस्ट उपस्थित होते. ह्या म्यूज़िक वीडियो मध्ये अरिश्फा खान आणि
अदनान शेख ह्या जोडी सोबत पाखी हेगड़े व अजय देखील झळकत आहे. अजय-संजीव द्वारा कंपोज
केलेल्या ह्या गाण्याची खास बाब ही आहे कि ह्यामधून एक्ट्रेस पाखी हेगडे गायकी मध्ये
आपला डेब्यू करत आहे, पाखी
ने हे गाणं अजय सोबत गायले आहे.
लग्नांच्या सीजन मध्ये हे एक जबरदस्त
वेडिंग सॉन्ग आहे, जे
संजीव चतुर्वेदी ने लिहिले आहे. एका थीम सोबत हा विडियो डायरेक्ट केला आहे अक्षय
के. अग्रवाल ने, तर
हा प्रोजेक्ट डिजाइन केला आहे अक्षय कलेडी ने. अजय केस्वानी आणि पाखी हेगड़े यांच्या
आवाजातील हे गाणं एखाद्या बॉलीवुड सिनेमासाठी केले आहे असे वाटते.
नवीन म्यूज़िक कंपनी व्हाइट बिलियनेयर
रेकॉर्ड्स चे मनोज लखानी ने येथे मीडियाला सांगितले कि ते आपल्या कंपनीच्या ह्या पहिल्या
प्रोजेक्टचा जबरदस्त रिस्पॉन्स पाहून फारच उत्साहित आहेत. ते म्हणाले कि नविन गायक,
कलाकारांना
एक प्लेटफॉर्म देण्यासाठी ह्या म्यूज़िक लेबलची सुरुवात केली आहे. डायमंड रिंगला फारच
चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, उत्तम
कमेंट्स येत आहेत, त्यामुळेच
भविष्यात अजून म्यूज़िक विडियो बनविण्याचा मानस आहे. त्यांच्या मनात ह्याचा
सीक्वेल "वेडिंग रिंग" बनविण्याचा देखील प्लान आहे.
Comments