‘सरसेनापती हंबीरराव’ च्या सेटवर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सामाजिक भान जपणारे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे चित्रीकरण भोरच्या ऐतिहासिक राजवाड्यात सध्या सुरु आहे, इथे भव्य सेट उभारण्यात आला आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटवर रविवारी ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत झाले. या प्रसंगी प्रविण विठ्ठल तरडे, डीओपी महेश लिमये यांच्यासह निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ असे ४०० हुन अधिक लोक उपस्थित होते. ‘सरसेनापती हंबीरराव’ या अतिभव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने भोरच्या ऐतिहासिक राजवाड्यात प्रजासात्तक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा झाला.
Comments