केसरी’ चित्रपटाच्या पोस्टरचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण
ग्र्त्च्स्च्स्त्च्त्र्त्च्त्
केसरी - saffron या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत अंतिम लढतीपूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे, अनिरुद्ध देशपांडे, अभिनेते महेश मांजरेकर, दिग्दर्शक सुजय डहाके, ‘केसरी’ - saffron मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता विराट मडके, निर्माते संतोष रामचंदानी, सहनिर्माते मनोहर रामचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते. भावना फिल्म्स एलएलपी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत ‘केसरी’ - saffron ची कथा कुस्ती भोवती गुंफण्यात आलेली आहे. कुस्ती खेळण्याची आवड असलेला अत्यंत गरीब घरातील एक मुलगा महाराष्ट्रातील मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतो. या प्रवासादरम्यान त्याच्या आयुष्यात येणारे विविध अडथळे, पहिलवानांचे कष्ट, त्यांना घडवणाऱ्या वस्तादांची मेहनत आणि कुस्तीच्या आखाड्या बाहेरचे राजकारण या सर्वांचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. ‘शाळा’, ‘आजोबा’, ‘फुंतरू’ या चित्रपटांनंतर सुजय पुन्हा एकदा मराठी बॉक्स ऑफिसचे मैदान मारायला सज्ज झाला आहे. ‘केसरी’ - saffron हा मराठी चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments