गायक शहज़ाद अली सध्या गायिकी मध्ये धम्माल करत आहे

गायक शहज़ाद अली ने संगीताचे प्रशिक्षण बीकानेर घराण्यातून घेतले आहे आणि शास्त्रीय संगीतात मास्टर आहे. हा शहज़ाद अली नुसरत फ़तेह अली ख़ान यांच्या वंशातील आहे.


शहज़ाद सध्या गाण्यामध्ये फारच व्यस्त आहे. त्याने नुकतेच पाचहून अधिक सिनेमे आणि पाचहून अधिक एल्बम मधून गाणी गायली आहे. त्याने नुकतेच लव यू टर्न मध्ये ग़म दिया गाणं गायले आहे, जे लोकांना फारच आवडले आहे.

शहज़ाद अली ने आपल्या गायिकीचा ठसा सर्वात पहिला सुर क्षेत्र शो द्वारे उमटविला होता. त्यानंतर लोकांनी त्याला द वॉइस व सारेगामा मध्ये देखील पसंत केले. शहज़ाद अली ने आतापर्यंत ३०० हून अधिक शो भारत व विदेशात केले आहेत.

त्याने नुकताच राहत फ़तेह अली ख़ान सोबत देखील शो केला आहे. त्याचे सध्या एक गाणं स्ट्रेपसिल्सच्या जाहिराती मध्ये देखील धम्माल करत आहे. लवकरच आणखी नवीन गाणी येत आहेत, त्याच्यासाठी आम्ही त्याचे अभिनंदन करतो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर