महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसांचे कैलेंडर २०२० लॉन्च

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसांचे कैलेंडर २०२० लॉन्च 

धर्मेंद्र, सलमान खान आणि शाहरूख खान यांच्या उपस्थितिमध्ये मुंबई पोलिसांचे कैलेंडर लॉन्च करण्यात आले

मुंबई पोलिस कैलेंडर २०२०, ह्यात सुप्रसिद्ध फोटोग्राफर प्रवीण तलन यांनी फोटोग्राफी केली आहे, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच लॉन्च केले गेले. "उमंग" नावाच्या ह्या भव्य कार्यक्रमात बॉलीवुड स्टार्स आणि पोलिसांच्या कुंटुंबातील लोक देखील उपस्थित होते.

बॉलीवुड मधील स्टार धर्मेंद्र आणि पोलिस आयुक्त, मुंबई श्री संजय बर्वे यांची खास करून येथे उपस्थित होते.

अत्यंत प्रतिष्ठित हे कैलेंडर श्वास थांबविणारी दृश्ये आणि भावनांसाठी ओळखले जाते आणि वर्षानुवर्षे संग्राहकाची वस्तू बनली आहे. हे व्यापक रूपाने कला, एक्शन आणि भावनांचे एक चांगले मिश्रण मानले जाते. मुंबईचे पोलिस आयुक्त, श्री संजय बर्वे म्हणाले, “मुंबई पोलिस मुंबईकरांवरती प्रेम करतात, त्यांना समजतात व त्यांची काळजी घेतात आणि ह्या शहरांबरोबर भावनात्मक संबंध स्थापित करतात. इतक्या मोठ्या शहराची सुरक्षा आणि व्यवस्थापनांचे एक मोठे काम आहे. हे कैलेंडर मुंबईकरांसोबत मुंबई पोलिसांतील पुरूष आणि महिलांचे मूड दर्शविते, जे लोकांची सेवा करतात आणि त्यांनी सुरक्षित ठेवतात.

कैलेंडर मध्ये शहरांतील पोलिस दलासाठी थरारक नविन एडिशंस जसे कि अत्यंत प्रशंसनीय स्निफर डॉग्स, बेल्जियन मैलिनोइस, के 9 यूनिट, माउंटेड पोलिस यूनिट आणि हवाई पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग समाविष्ट आहे. माउंटेड पोलिस यूनिट साठी औपचारिक गणवेश प्रसिद्ध डिजाइनर मनीष मल्होत्रा ने डिजाइन केला आहे.

मुंबई पोलिसांनी काही बॉलीवुड सिनेमांना प्रेरित केले आहे आणि कैलेंडरचे कवर पेज एखाद्या फिल्मी पोस्टर सारखे दिसते, त्यामध्ये एका पोलिस महिलेचा आत्मविश्वासमय चेहरा आहे, जे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. कैलेंडर मध्ये मासे पकडणा-या गावापासून कॉलेज कैंपस, वर्ली सी लिंक ते मंत्रालयापर्यंत विविध मनोरंजक देखावे शूट केले गेले आहेत आणि अनेक हृदयस्पर्शी क्षण शूट केले गेले आहेत. कैलेंडर मधील सर्वात चांगली बाब ही आहे कि फोटोग्राफर प्रवीण तलन ने मागील पाच वर्षांहून अधिक ताजेपणा आणि आवाहन केले आहे आणि प्रत्येक वेळी प्रदर्शन करण्यासाठी काहीतरी नवीन निवडले आहे.

यावेळी श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसाकडून देशभरातील संरक्षण आणि पोलिस दलाचे अनोखे आणि प्रेरणादायक छायाचित्र काढण्यासाठी मोलाच्या योगदानाबद्दल प्रवीण तलन यांना देखील सन्मानित करण्यात आले. बर्याणच सीमा आणि धोकादायक भागात व्यापलेल्या भारताच्या जवळपास सर्व विशेष दलांचे फोटो काढण्याचे त्याला वेगळेपण आहे.

एसोसिएट फोटोग्राफर रूपाली सागर ने सांगितले, “दरवर्षी अनोख्या शॉट्स सोबत येणे फारच कठीण आहे, पंरतु मुंबई  पोलिसांकडून नेहमीच अशा अनेक ऑफर असतात आणि सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), श्री विनय चौबे आमच्या बरोबर होते, ज्यांनी संपूर्ण क्रिएटिव्ह प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले आणि आम्हांला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले.” इवेंट मध्ये बॉलीवुडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांना कैलेंडराची एक प्रत भेट देण्यात आली, ज्यांनी ह्या शहरांच्या पोलिस दलाबद्दल प्रेम आणि आदर दाखविला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर